Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त, सध्या एकही सक्रिय रुग्ण नाही; पॉजिटिवीटी दर शून्य

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी पूर्ण देश सामना आहे. दरम्यान राज्यातून एक चांगली बातमी समोर येत आहे. विदर्भातील भंडारा जिल्हा पुर्णपणे कोरोनामुक्त झाला असून, कोरोना मुक्त होणारा राज्यातील पहिला जिल्हा बनला आहे. काल शुक्रवारी शेवटचा कोरोना रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर जिल्ह्यात एकही सक्रिय रुग्ण उरला नाही. तसेच शुक्रवारी झालेल्या कोरोना चाचण्यामध्ये एकही रुग्ण आढळला नाही.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान महाराष्ट्र हा देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य होते. दुसऱ्या लाटेतून सावरत असलेल्या राज्यात आता कोविड -19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी जोरात सुरू आहे.

पहिला रुग्ण 27 एप्रिल 2020 रोजी सापडला

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम म्हणाले की, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे. त्यांनी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटच्या रणनीतीचाही उल्लेख केला. भंडारा जिल्ह्यात गेल्या वर्षी 27 एप्रिल रोजी गराडा बुद्रुक गावात कोविडचा रुग्ण पहिला आढळला होता. जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधिक 1596 रुग्ण यावर्षी 12 एप्रिल रोजी सापडली होती. तसेच 18 एप्रिल रोजी सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या 12,847 होती. जिल्ह्यात कोविडमुळे पहिला मृत्यू 12 जुलै 2020 रोजी झाला.

पॉजिटिवीटी दर आता शून्य

18 एप्रिल नंतर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी होत गेली. जिल्हाधिकारी कदम यांनी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, तेव्हापासून जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्याने संक्रमित झालेल्यांपेक्षा वाढत गेली. प्रेस नोटमध्ये सांगण्यात आले की या वर्षी 19 एप्रिल रोजी बरे होण्याचा दर 62.58 टक्क्यांवर आला होता, जो आता 98.11 टक्के झाला आहे. 12 एप्रिल रोजी सकारात्मकतेचा दर 55.73 टक्के होता, जो आता शून्य झाला आहे. याशिवाय जिल्ह्यात मृत्यूदर 1.89 टक्के आहे.

40 टक्के लोकांचे लसीकरण

आतापर्यंत जिल्ह्यात कोविड -19 च्या एकूण 4 लाख 49 हजार 832 चाचण्या झाल्या आहेत, त्यापैकी 59 हजार 809 नमुने पॉझिटिव्ह आढळले. यापैकी 58 हजार 776 रुग्ण बरे झाल. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना कदम म्हणाले, ‘आम्ही जिल्ह्यातील लक्ष्यित 9.5 लाख लोकसंख्येच्या 40 टक्क्यांहून अधिक लोकांचे लसीकरण केले असून, यापैकी 15 टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.

 

Comments are closed.