Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे… 1 सप्टेंबर पासून डिज्नी+ हॉटस्टारचे प्लॅन होत आहेत महाग, जाणून घ्या सविस्तर माहिती

टेक: मोबाइल इंटरनेट आणि ब्रॉडब्रॅंड इंटरनेट दर स्वस्त झाल्यापासुन देशात ऑनलाइन सिनेमा पाहणे प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यातच कोरोना महामारीमुळे सिनेमागृह बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात  लोकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घेणे पसंत केले. सध्या भारतात शेकडो ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यापैकि एक आहे डिज्नी+ हॉटस्टार. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आयपीएलचे थेट प्रक्षेपण हॉट असते. भारतात क्रिकेट चाहत्यांची संख्या इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त असल्याने साहजिकच डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन घेणार्‍यांची संख्या प्रचंड मोठी आहे.

डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन असणार्‍यांसाठी किंवा नवीन सबस्क्रिप्शन घेऊ इच्छिणार्‍यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी+ हॉटस्टारने जाहीर केले आहे की नवीन सब्सक्रिप्शन पॅक 1 सप्टेंबरपासून लागू होतील. कंपनीने 399 रुपयांचे व्हीआयपी सबस्क्रिप्शन बंद केले असून,कंपनी आता ग्राहकांना तीन नवीन प्लॅनमधून निवड करण्याचा पर्याय देईल. या प्लॅन्सची किंमत 499 रुपये, 899 रुपये आणि 1,499 रुपये आहे.

विद्यमान सदस्यांचे प्लॅन वैधता संपेपर्यंत सुरू असतील

या नवीन योजना सर्व नवीन वापरकर्ते आणि विद्यमान वापरकर्त्यांना लागू होतील. विद्यमान सदस्य ज्यांच्याकडे आधीपासूनच डिज्नी+ हॉटस्टारचे  सब्सक्रिप्शन आहे, त्यांना त्यांच्या प्लॅनची वैधता संपेपर्यंत पूर्वीप्रमाणेच सेवा मिळत राहील.

हे आहेत नवीन प्लॅन!

499 रुपयांचा प्लान

डिज्नी+ हॉटस्टार सर्वात स्वस्त प्लॅन आता 499 रुपयांचा आहे. तथापि, स्ट्रिमिंग क्वालिटी एचडी(HD Streaming Quality) पर्यंत मर्यादित करण्यात आली असून, कंटेंट केवळ मोबाइल फोनवर उपलब्ध असेल.

899 रुपयांचा प्लान

899 रुपयांचा प्लॅन ज्या ग्राहकांना टीव्हीवर डिस्ने+ हॉटस्टार वर उपलब्ध असलेला कंटेंट स्ट्रीम करायचा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन  उपयुक्त आहे. यामध्ये एचडी कंटेंट स्ट्रीमिंग एकाच वेळी दोन उपकरणांवर करता येते. ही दोन उपकरणे टॅब्लेट, टीव्ही किंवा मोबाईल असू शकतात.

1499 रुपयांचा प्लान

ही डिज्नी+ हॉटस्टारची सर्वात मुख्य योजना असून, 4K क्वालिटी मध्ये कंटेंट प्रदान करते. यामध्ये, वापरकर्ते एकाच वेळी चार उपकरणांवर कंटेंट स्ट्रिम करू शकतात. एकदा वापरकर्त्यांची संख्या चारपेक्षा जास्त झाली की, पूर्वी लॉग इन केलेल्या खात्यांपैकी एक आपोआप लॉग आउट होईल.

सध्या उपलब्ध मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या तुयलनेत  डिज्नी+ हॉटस्टार स्वस्त होते. मात्र, आता डिज्नी+ हॉटस्टारचे नवीन सबस्क्रिप्शन पॅक लागू झाल्यानंतर काही लोक नेटफ्लिक्स किंवा अमेझोन प्राइम विडिओकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments are closed.