Take a fresh look at your lifestyle.

भवरोगापासून मुक्त होण्यासाठी संतसंग आवश्यक सेलू येथे किर्तन महोत्सवात रामराव ढोक महाराजांचे प्रतिपादन

सेलू :- ब्रह्मज्ञान झटपट कळत नाही. त्यासाठी संतसेवा करावी लागते. संत हे सुखाचे आगर असल्यामुळे अन्य कोणतीही गोष्ट करू नका. केवळ संतसंगामुळेच भवरोगापासून मुक्ती मिळू शकते असे प्रतिपादन रामराव महाराज ढोक यांनी सेलू येथे केले.

सेलू येथे पवन हेमंतराव आडळकर मित्र परिवाराच्या वतीने पाच दिवशीय भव्य किर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी २४ डिसेंबर रोजी माजी आमदार हरिभाऊ लहाने, सुरेश नागरे, साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, जिल्हा परिषदेचे सदस्य अशोक काकडे, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, चक्रधर पौळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून किर्तन महोत्सवाचा आरंभ झाला. यावेळी रामराव ढोक महाराजांनी उजळले भाग्य आता । अवघी चिंता वारिली ॥ संतदर्शने हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ या जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आपल्या शुश्राव्य व मधूर वाणीने भावार्थ व यथार्थ निरूपण करून उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले जन्मजन्मांतरीचे पूर्वजन्मी पुण्य केले असल्यामुळेच संतांची भेट होते. आणि संतांचा सतसंग झाल्यामुळे भाग्य उजळते. सर्व चिंता नष्ट होऊन आपोआपच देव जोडला जातो. सूर्य, हिरा, दिवा या गोष्टी दृश्य वस्तूच दाखवितात. अदृश्य वस्तू दाखविण्याचे सामर्थ्य केवळ संतांपाशी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आपण न बोलावता गेलं पाहिजे. प्रसिद्ध मृदंगाचार्य राम काजळे यांनी किर्तनात मृदंगाची साथ दिली. किर्तन श्रवणासाठी सेलू शहरासह तालुक्यातील भाविकांची गर्दी उसळली होती…

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.