Take a fresh look at your lifestyle.

शाश्वत विकासासाठी लोक सहभाग आवश्यक तहसीलदार झांपले

सेलू (डाॅ विलास मोरे) : गावाचा शाश्वत विकास साधायचा असेल तर विकासाचा कृती आराखडा तयार करून लोक सहभागातून कामे करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन तहसीलदार दिनेश झांपले यांनी ता. १७ नोव्हेंबर रोजी गुगळी धामनगाव येथे केले.

सेलू तालुक्यातील गुगळी धामनगाव येथे ग्रामस्थांनी लोकवर्गनी करून शेत रस्त्याचे काम सुरू केले आहे. या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन तहसीलदार दिनेश झांपले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच शारदा महाजन, तुकाराम महाजन, पोलीस पाटील अशोक डख, दत्तात्रय डख, विठ्ठल डख, रामराव डख, मुंजाभाऊ डख, जयवंत डख, संजय गोरे यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना तहसीलदार झांपले म्हणाले की, गावाचा विकास करताना स्थानिक मतभेद बाजूला सारून काम हेच धोरण अवलंबिले आहे. प्रत्येक कामात लोकसहभाग वाढला तर गावात विकासाची गंगा वाहात येते. गावात सरकारी योजना राबवताना नागरीकांनी सकारात्मक लोकसहभाग वाढवावा असे आवाहन यावेळी श्री झांपले यांनी केले….

Comments are closed.