Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र होतोय मद्यराष्ट्र! आता दारू मिळणार सुपर मार्केटमध्ये, फडणवीसांनी घेतली ठाकरे सरकारची शाळा ‘ म्हणाले खपवून घेतले जाणार नाही’.

राजकिय गोष्ट म्हणजे जणू शिगेला पोहचलेली असते. यात नेहमी चढ उतार होत राहतात. एकमेकांच्या बद्दल असणारे मत, मतभेद यामुळे राजकीय साधन संपत्ती यामध्ये चढ उतार होताना दिसून येत असतो. नुकताच झालेल्या कॅबिनेट बैठकीत सध्याचे सरकार ठाकरे सरकारने सध्या राज्यातील किराणा दुकाने असो किव्हा मार्केट वाईन विक्री याला सरकारने परवानगी देण्याचे ठरवले आहे. या निर्णयावर भाजपने परवानगी मोडीत काढण्याचे ठरवले आहे. राज्य सरकारने सुपर मार्केट वाईन आणि किराणा दुकानाच्या वाढत्या धंद्यामुळे पाहता त्यातील महसूल वाढविण्यासाठी याला परवानगी देण्याचे ठरवले आहे. वाईन विक्रीच्या परवानगीला आज बैठकीत परवानगी देण्यात आली आहे.

या परवानगीवर आक्रमकता दाखवत विरोधीपक्ष नेते आणि माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध दर्शविला आहे. त्यांनी ट्विटरवर ट्विट करत याबद्दल नाराजी दर्शवली आहे. ते म्हणतात की, शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच! महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे..? सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी. अश्या शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली आहे. त्याचा पुरावा तुम्ही खालील दिलेल्या ट्विटमध्ये पाहू शकता. सरकारने फक्त दारूला प्राधान्य दिलेले पाहून त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र विरोध दर्शविला आणि त्याचबरोबर ट्विट करून खडा बोल सूनावला.

महाराष्ट्र सरकारला मद्यराष्ट्र मी होऊ देणार नाही.

राज्यात पेट्रोल डिझेलचे वाढते दर कमी न करता. त्या उलट दारू स्वतः करून त्यास सुपर मार्केट मध्ये विक्री करण्यास पाठिंबा दिला जातोय. थेट किराणाच्या दुकानातून मद्य विक्री झाल्यास ते कोणतेही चांगले बदल नसणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवणं हे खपवून घेतले जाणार नाही. अश्या शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारला झापले.

सरकारचा नवीन निर्णय!

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याची मंत्रिमंडळाची बैठक पार झाली. यामध्ये महसूल वाढवण्याच्या दृष्टीकोनातून हा प्रस्ताव मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. आता सुपर मार्केटमध्ये वाईन उपलब्ध होणार आहे त्यासाठी जे सुपर मार्केट एक हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारने परवानगी दिली.

Comments are closed.