Take a fresh look at your lifestyle.

काळजाचा थरकाप उडवणारी घटना, आई आणि बहिणी हत्या करून डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; कारण ऐकून विश्वास बसणार नाही

रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका महिला डॉक्टरने आई आणि बहिणीला इंजेक्शन देऊन कथितरित्या ठार केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. आई आणि बहिणीच्या हत्येनंतर डॉक्टर महिलेने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येच्या प्रयत्न केला. मात्र, महिला डॉक्टरच जीव वाचला.

कुठे घडली ही काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना?

प्राप्त माहितीनुसार, ही घटना गुजरातमधील सुरतच्या कटग्राम भागात घडली आहे. सध्या  आरोपी महिला डॉक्टरवर उपचार सुरू आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय महिला डॉक्टर दर्शना प्रजापती यांनी रक्षाबंधनच्या आदल्या रात्री शनिवारी आई मंजुलाबेन (वय 59) आणि बहीण फाल्गुनी (वय 28) यांना गुंगीच्या औषधाचे इंजेक्शन दिले, त्यामुळे त्या दोघींचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. यानंतर महिलेने स्वतः  झोपीच्या औषधाच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करणायचा अयशस्वी प्रयत्न केला. सध्या आरोपीवर सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

डी-डिव्हिजनचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) डी.जे. चावडा यांनी पत्रकारांना सांगितले की, “मंजुलाबेन आणि फाल्गुनी दोघांचाही मृत्यू औषधांच्या ओवरडोसमुळे झाला, तर डॉ. दर्शना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, जिथे पोलिसांनी आरोपीचे बयाण नोंदवले.

आरोपी डॉ. दर्शना यांनी सांगितले कारण

डॉ. दर्शना त्यांच्या आयुष्याला कंटाळल्या असल्याचे त्यांनी  पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. डॉ. दर्शनाची आई आणि बहीण दोघीही त्यांच्यावर अवलंबून होत्या. त्यामुळे त्या आयुष्याला कंटाळल्या होत्या. मग त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. स्वतःला मारण्यापूर्वी आई आणि बहिणीची हत्या करण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे तिने इंजेक्शन देऊन आई-बहिणीची हत्या केली.

डॉ. दर्शना तिची आई, बहीण, भाऊ आणि भावजयीसोबत चौकबाजार पोलीस स्टेशन परिसरातील कटारगाम परिसरातील सहजानंद सोसायटीमध्ये राहत होती. घटनेच्या वेळी तिचा भाऊ आणि वहिनी घराबाहेर होते.

पोलिसांनी सांगितले की, ‘ दोघींचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी डॉक्टर दर्शनाचे बयान नोंदवले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.