Take a fresh look at your lifestyle.

डासाळा जिल्हा बँकेची पाच लाखाची रोकड लुटली

सेलू तालुक्यातील देऊळगाव पाटी जवळील घटना चोरट्यांनी पावणेदोन लाख रुपये रस्त्यावर फेकले

सेलू :- तालुक्यातील डासाळा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी पाच लाखाची रोकड घेऊन मोटरसायकलवरून जात असताना या कर्मचाऱ्या जवळील रोकड दोन अज्ञात चोरट्यांनी लुटली असल्याची घटना मंगळवारी ४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० सुमारास घडली. पोलीस आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला असता रूढी पाटी जवळ चोरट्यांनी पावणेदोन लाख रुपये रस्त्यावर फेकले.

या घटनेविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की डासाळा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखाधिकारी श्री मांडे आणि रोखपाल बालासाहेब जाधव हे सेलू येथील मुख्य शाखेतून मंगळवार 4 जानेवारी रोजी डासाळा येथे बँकेतील ग्राहकांना रक्कम वितरित करण्यासाठी जात होते. देऊळगाव गात पाटीजवळ विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात स्प्रे मारून पाच लाखाची रोकड असलेली पिशवी घेऊन मानोली मार्गे धूम ठोकली. दोन्ही कर्मचाऱ्याने प्रसंग प्रसंगावधान साधून घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक साईनाथ अनमोड, पोलीस कर्मचारी उमेश बाराहाते, आप्पा वराडे, शेख गौस यांनी चोरांचा पाठलाग सुरू केला. पोलीस कर्मचारी पाटलाग करत असल्याचे लक्षात आल्यावर चोरट्यांनी त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी मानवत तालुक्यातील रूढी पाटी जवळ पावणेदोन लाख रुपये रस्त्यावर फेकले पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेऊन पाठलाग सुरूच ठेवला. दुचाकीवरील चोरटे मानवत मार्गे परभणी कडे पसार झाले. चोरट्यांना पकडण्यात पोलीसांना अद्याप तरी यश आले नाही.

□चौकटीचा मजकूर…

“मध्यवर्ती बँकेची रक्कम लुटण्याची सेलू तालुक्यातील ही चौथी घटना असून या घटने अगोदर चोरट्यांनी तीन वेळेस जिल्हा मध्यवर्ती बँकेला लक्ष करत रोकड लुटली आहे.”

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.