Take a fresh look at your lifestyle.

दांडिया उत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद ! नवरात्र महोत्सवा निमित्त श्रीराम प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम

सेलू (डाॅ विलास मोरे) : नवरात्र महोत्सवा निमित्त श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने १९ ऑक्टोबर रोजी विद्याविहार संकुलात आयोजित केलेल्या दांडीया उत्सवात महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने महिला व मुलीं करिता नवरात्र महोत्सवनिमित्य दांडीया उत्सव यामध्ये वैयक्तीक दांडिया, ग्रृप दांडिया व उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटक संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ सविता रोडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा निर्मला लिपणे, स्पर्धेच्या परिक्षक रोहिणी राजुरकर, कांचण बाहेती, मनिषा बोराडे, मिनाक्षी रत्नपारखी, शालिनी शेळके, प्रगती क्षीरसागर, रत्नमाला कार्तिक आदींची उपस्थिती होती.

मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत १०९ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. वैयक्तीक दांडिया स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या कु. ऋतूजा काबरा हिला १००० रू. रोख पारितोषिक देण्यात आले. द्वितीय विजेता निकिता मेहता हिला ७०० रू. तर तृतीय विजेत्या श्रुती ठाकूर हिला ५०० रू. रोख पारितोषिक देण्यात आले.  उत्तेजनार्थ म्हणून प्रेरणा काष्टे, जान्हवी पौळ, साक्षी काष्ठे यांना प्रत्येकी ५०० रु प्रमाणे रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ग्रुप दांडिया स्पर्धेत प्रथम आलेल्या आयडीयल ग्रुपला रोख ३००० रू., नवउत्सव ग्रुपला द्वितीय रोख २००० रू. तर तृतीय पारितोषिक रोख १००० रू. जिनिअस ग्रृपला देण्यात आले. उत्तेजनार्थ म्हणुन इतर सहभागी ०६ ग्रृपला प्रत्येकी ५०० रू. प्रमाणे रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

तसेच उत्कृष्ट वेशभूषा मध्ये प्रथम पारितोषिक रोख १०००/-रु. ऋतुजा काबरा, द्वितीय पारितोषिक रोख ५००/- रु. रिद्धी बोकण हिला मिळाले. त्याच बरोबर संस्थेतील एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर तीन ग्रृपला प्रत्येकी १०००/-, १०००/- व ५००/- रु देऊन गौरविण्यात आले….

Comments are closed.