Take a fresh look at your lifestyle.

संतापजनक: स्वातंत्र्यदिनीच जमावाने महिला टिकटॉक स्टारचे फाडले कपडे; एफआयआर दाखल, जाणून घ्या कुठे घडली घटना

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घडलेली एक अतिशय लाजिरवाणी घटना समोर आली आहे. एका महिला टिकटॉक स्टारला स्वातंत्र्य दिन साजरा करणे महागात पडले.  शेकडो लोकांच्या जमावाने एका महिला टिकटॉक स्टारचे कपडे फाडल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. लॉरी अड्डा पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरनुसार, जमावाने टिकटॉक स्टारचे कपडे फाडून हवेत फेकले.

ही घटना पाकिस्तान मध्ये घडली

माणुसकीला काळिमा फासणारी घटन शेजारी राष्ट्र पाकिस्तान येथे घडली असून, स्थानिक माध्यमांनी वृतांकन केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. एफआयआरनुसार, महिला टिकटॉकर तिच्या सहा साथीदारांसह मिनार-ए-पाकिस्तानजवळ व्हिडिओ बनवत होती, तेव्हा सुमारे 300 ते 400 लोकांच्या जमावाने तिच्यावर हल्ला केला.

नगद रक्कम पण पळवली

याशिवाय त्यांच्याकडून सुमारे 15 हजार रुपयांची रोकड आणि ओळखपत्रही हिसकावण्यात आले. काही लोकांनी त्या महिलेला मदत करण्याचा प्रयत्न केला पण जमाव अतिशय रागत असल्याने लोकांना महिलेची मदत करता. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि देशभरात या लज्जास्पद घटनेवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मारहाणीचा विडिओ येथे पहा

Comments are closed.