Take a fresh look at your lifestyle.

राज्यात शाळा उघडण्याची तयारी सुरु; मात्र कोविड टास्क फोर्सने घातल्या अटी, जाणून घ्या सविस्तर माहिती

नवी मुंबई : दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्ग (कोविड -19) कमी झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये शाळा उघडल्या आहेत. महाराष्ट्र सरकारसुद्धा पुन्हा शाळा सुरू करण्याचा विचार करत आहे. पण महाविकास आघाडी सरकारसाठी हा निर्णय सोपा असणार नाही.15 सप्टेंबरनंतर राज्यात कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सध्या केरळ नंतर महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

राज्यात ५० हजारांपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण 

गुरुवारी, महाराष्ट्रात कोरोनाची 4,342 नवीन प्रकरणे आढळली आणि 55 लोकांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 50 हजारांहून अधिक आहे. त्यामुळे कोविड टास्क फोर्सने शाळा उघडण्यापूर्वी सरकारसमोर अनेक अटी ठेवल्या आहेत.

शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत पुढील दोन दिवसात निर्णय घेतला जाईल. या संदर्भात येत्या काही दिवसात एक बैठक आयोजित केली जाईल. याची माहिती बच्चू कडू  यांनी दिली होती.

“देशातील इतर राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रातही शाळा सुरू झाल्या पाहिजेत. परंतु केरळ नंतर महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय प्रकरणे आहेत हे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागेल.” असेही बच्चू कडू यांनी सांगितले होते.

मागील वर्षापासून शाळा बंद आहेत

गेल्या वर्षी मार्चपासून महाराष्ट्रातील शाळेतील सर्व वर्ग बंद आहेत. मात्र, ग्रामीण भागातील शाळा उघडण्याची परवानगी यावर्षी जुलै मध्ये देण्यात आली होती. परंतु केव्हा ८ वी  ते १२ वी पर्यंतच्या मुलानांच शाळेला जायची परवानगी होती. ज्या भागात कोरोनाची खूप कमी प्रकरणे आहेत त्याच भागातील काही शाळा सुरु होत्या.

टास्क फोर्सची शिफारस

जर शाळा सुरु करायच्या असतील तर कोविड टास्क फोर्सने काही अटी महाविकास आघाडी सरकारपुढे ठेवल्या आहेत.

सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे  लसीकरण करण्याची शिफारस टास्क फोर्सने केली आहे. वर्गात व्यवस्थित बसण्याची व्यवस्था असावी आणि एक बेंच फक्त एकाच  विद्यार्थ्यासाठी राखीव असावा.

टास्क फोर्स  एक सदस्य डॉकटर बकुळ पारेख म्हणाले, ‘शक्य असल्यास, शाळेने ऑनलाइन आणि ऑफलाइन वर्ग एकाच वेळी आयोजित केले पाहिजेत. विद्यार्थी रोटेशन बेसिस वर वर्गांना उपस्थित राहू शकतात. वर्ग नियमित स्वच्छ केले गेले पाहिजेत आणि सर्व शाळांमध्ये मॉनिटरिंग सिस्टीम असावी.”

वेगवेगळ्या बॅचमध्ये घ्यावे  वर्ग
डॉ. पारेख पारेख म्हणाले, शाळांनी विद्यार्थ्यांचे दोन तुकड्यांमध्ये विभाजन केले पाहिजे आणि त्यांना पर्यायी दिवशी शाळेत बोलावले पाहिजे. उदाहरणार्थ, अर्ध्या विद्यार्थ्यांना आज आणि उर्वरित उद्या आणि ऑनलाईन वर्ग देखील चालू ठेवता येतील.

सुरक्षेची खास काळजी घेणे गरजेचे 

शालेय मुलांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या  खिडक्या बंद असू नयेत आणि हवा खेळती असावी. सध्या शाळेत क्रीडा उपक्रम राबवण्यात येऊ नये. पारेख पुढे म्हणाले, “टास्क फोर्सने शाळा पुन्हा सुरू करण्यापूर्वी पालक-शिक्षकांच्या बैठका आयोजित करण्याचे संबंधित शाळेच्या प्रशासनाला सुचवले आहे.

Comments are closed.