Take a fresh look at your lifestyle.

कोरोना नियमांचे सेलूत सर्रास उलंघन

पार्ट्या, लग्न सोहळे धुमधडाक्यात मास्क नाही, सोशल डिस्टंसींग नाही कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची भिती

□ सेलू :- कोरोना नंतर आता ओमायक्राॅनचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अमलबजावणी करण्यासाठी काढलेल्या नियमांचा सेलूत अक्षरशः फज्जा उडाला आहे. प्रशासकीय यंत्रणा असो वा नागरीक कोणीही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.

ओमायक्राॅनचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून कोरोना नियमाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी विविध आदेश काढण्यात आले. यात एकही लस न घेणाऱ्या नागरिकांना पेट्रोल पंपावरून पेट्रोल व डिझेल दिले जाऊ नये. तसेच खाजगी वाहतूक दाराने लस न घेतल्यास प्रवाशांची वाहतूक केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सर्व यंत्रणांना दिलेले आदेश केवळ कागदावरच असल्याचे पाहावयास मिळत आहे. शासकीय कार्यालय असो अथवा सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी कुठेही गेल्यावर लस घेतली का याची विचारणा सुद्धा केली जात नसल्याचे प्रत्यक्ष दिसून येते. प्रशासनाकडून खडक उपाय करून सार्वजनिक ठिकाणी नियम मोडून वावरणाऱ्यावर कारवाई गरजेचे आहे. बाजारपेठेत विविध प्रतिष्ठान वर असो बस स्टँड परिसर असो रेल्वे स्टेशन असो वा आठवडी बाजार या ठिकाणी विना मास्क व सोशल डिस्टंसींगचे पालन न करता फिरणाऱ्यांना कुठलाही वचक राहीला नाही किंवा लस घेतली का नाही असे कुणीही विचारणा करत नाही. शहरात बिनदिक्कतपणे विना मास्क फिरताना नागरिक दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमाची कडक अमलबजावणी झाली नाही तर कोरोना संसर्ग वाढीचा धोका वाढू शकतो…

□ लसीकरणाचा टक्का वाढावा म्हणून आरोग्य विभागाने विविध प्रभागात कोरोना लस उपलब्ध करून दिली असली तरी. नागरीक लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत.
□ विना मास्क फिरू नका, सोशल डिस्टंसींगचे पालन करा, लस न घेतल्यांना प्रतिबंद करा असे विविध आदेश जिल्हा प्रशासनाने काढले असताना शहरात ओल्या पार्ट्यां, वाढदिवसाच्या पार्ट्या, लग्न सोहळे कोणत्याही नियमाचे पालन न करता मोठ्या धुमधडाक्यात पार पडत आहेत. याला प्रतिबंध करणेकामी प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे.

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.