Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक: जीवंत असताना प्रेमविवाहाला परवानगी दिली नाही, आत्महत्येनंतर कुटुंबियांनी लावले लग्न

जळगाव: भारतीय समाजात आजही प्रेमविवाह करणे फार अवघड आहे. बर्‍याच प्रेमी युगुलांना लग्न करायचे असते मात्र त्यांच्या घरचे परवानगी देत नाहीत. त्यामुळे हताश होऊन बर्‍याच जोडप्यांनी एकत्र आत्महत्या केल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात. अशीच एक घटन जळगाव जिल्ह्यात घडली आहे.

जळगाव जिल्ह्यातील वाडे गावात राहणार्‍या एका प्रेमी युगुलाचे जीवंत असताना लग्न करण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. दोघांच्या कुटुंबियांनी लग्नाला नकार दिल्याने दोघांनीही आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे सांकेतिक लग्न लावले.

माडे गावात राहणारा 22 वर्षीय मुकेश सोनवणे आणि पलाड गावात राहणारी नेहा ठाकरे यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांचे एकमेकावर खूप प्रेम होते. दोघांना लग्न करून एकत्र जीवन जगायचे होते. त्यांनी यासाठी त्यांच्या कुटुंबियांची परवानगी मागितली. पण त्यांना परवानगी मिळाली नाही. दोघेही एकाच समाजातील होते तरीही कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली नाही.

जेव्हा कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला तेव्हा त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मूळचे मलाड गावचे रहिवाशी असलेले नेहाचे कुटुंब काही काळापासून वाडे गावात राहत होते. इथेच नेहा आणि मुकेशचे सूत जुळले. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, प्राथमिक तपासात या दोघांचे प्रेम संबंध होते आणि हे दोघे लग्न करू इच्छित होते, मात्र त्यांच्या कुटुंबियांनी नकार दिल्याची माहिती समोर आली.

मुकेशने नेहाच्या कुटुंबियलाही लग्नासाठी समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यानही नकार दिला. त्यामुळे नाराज होऊन दोघांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मुकेशने त्याच्या मरण्यापूर्वी व्हॉट्सअॅप स्टेटसवर बाय संदेशही टाकला होता. मात्र, या दोघांकडून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही.

दोघांच्या प्रेताचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे मृतदेह वाडे गावात नेण्यात आले. दोघांच्या मृतदेहावर तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी दोघांचे सांकेतिक लग्न लावून दिले.

Comments are closed.