सेलू : देशात ओमायक्राॅनचे रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सेलू येथील स्थानिक प्रशासनाने शहरात कडक निर्बंध लागू केले असून जे नागरीक कोविड-19 चे दोन्ही डोस घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
देशात आगोदर कोरोना नंतर डेल्टा तर आता ओमायक्राॅनचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सेलू शहरात नगर पालिका, पोलीस व महसूल प्रशासन अलर्ट झाले आहे. कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेणारे नागरीकांना शहरातील दुकानावर सामान खरेदी करता येणार असल्याचे फलक बाजारपेठेत लावण्यात आले आहेत. तसेच दोन्ही डोस घेणारे नागरीकांनाच पेट्रोल व डिझेल दिल्या जात आहे. शहरातील बाजारपेठेत फिरून प्रशासनाचे पथक नियम मोडणारावर दंडात्मक कारवाई करत आहेत. जिल्हाधिकारी आंचल गोयल ग्रामीण भागात जाऊन कोविड लस घेण्याबाबत जनजागृती करत आहेत. उपविभागीय अधिकारी अरूना संगेवार आपल्या पथकासह रस्त्यावर फिरून नागरीकांना अलर्ट करत आहेत. जे नागरीक शासनाने घालून देलेले निर्बंधाचे पालन करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई कारवाई केली जात आहे. पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड व नगर पालिकेचे मुख्याधिकारी सुंकेवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसाठी विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील सर्व दुकानावर येणाऱ्या ग्राहकांची नोंदणी केली जात असून ग्राहकांनी मास्क लावले आहे का ? कोविड-19 चे दोन्ही डोस घेतले आहेत की नाही ? या सर्व बाबी तपासल्या जात आहेत. निर्बंध न पाळणारे नागरीकांवर कायदेशीर कारवाई केल्या जात आहे. सध्या तरी प्रशासनाच्या जागरूकतेमुळे सेलू शहरात ओमायक्राॅनचा एकही रूग्ण आभळून आला नाही. मात्र नागरीकांनी स्वतःसह कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी दोन्ही लसीचे डोस घेणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टंसींग चे पालन करणे आवश्यक आहे.
- डाॅ विलास मोरे, सेलू
Comments are closed.