Take a fresh look at your lifestyle.

नगर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा..

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा आकडा वाढू लागला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून कोरोनाची दररोज 700 ते 800 बाधित रूग्णाची नोंद होत आहे. आज 900 कोरोना बाधित रुग्ण नगर जिल्ह्यात आढळून आले. यामुळे कोरूना चा धोका वरचेवर वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनाव्हायरस सुरू झाल्यापासूनच अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्नाचा आकडा वाढता आहे. पहिल्या लाटेत व दुसऱ्याला कळतही रुग्ण संख्या मोठी होती दुसऱ्या लाटेत अंतर दिवसाला पाच हजार रुग्णांपर्यंत आकडा होत होता. दुसरीच्या काळामध्ये दुसरी लाट कमी झाल्यानंतर बाधित रुग्णांचा आकडा 300 वर आला होता. आता पुन्हा गेल्या पंधरा दिवसापासून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आता सध्या दररोज 700 ते 800 रुपये वाढ होत असून आज नऊसे चा आकडा पार केला आहे. यामुळे नगर जिल्ह्यात कोरोनाचा धोका अधिक वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.

नगर शहरामध्ये मोहरमचा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोणामुळे हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आता गणपती, गौरी आणि दसरा, दिवाळीचा सण आलेला आहे. नगर मध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो परंतु कोरोनामुळे यंदाही हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर, पारनेर, श्रीगोदा,अकोले तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या अधिक आहे. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments are closed.