Take a fresh look at your lifestyle.

श्रीराम प्रतिष्ठान येथे संविधान अर्पण दिन साजरा

सेलू (डाॅ विलास मोरे) :-  येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित डॉ. राम रोडगे अध्यापक विद्यालय व महाविद्यालय, अपूर्वा पॉलिटेक्निक व आदित्य अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  महाविद्यालयात सविधान अर्पण दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन करण्यात आली. यावेळी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. संविधानात अस्तित्व असलेल्या कलमाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. बी. के सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, अपूर्वा तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. अशोक बोडखे, आदित्य अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. मिनाक्षी रत्नपारखी व  प्रा. श्रीनिवास कुमार आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. बालाजी राठोड तर आभार प्रदर्शन प्रा. वैद्य यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका