Take a fresh look at your lifestyle.

भारतमातचे नाव घेऊन सत्तेत आले अन भारतमातेलाच विकायला निघाले, ‘या’ कॉंग्रेस नेत्याची मोदी सरकारवर जोरदार टीका

मुंबई: ज्यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काहीच योगदान नाही, ते लोक इतिहासाची भेसळ करून चुकीचा इतिहास मांडत लोकांची दिशाभूल करत असतात. ज्यांनी भारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवली तेच आता त्याच भारतमातेला विकायला निघाले आहेत, असा जबरदस्त टोला महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी लगावला.

पुण्यातील केसरी वाड्यात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कॉंग्रेसच्या वतीने ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी नाना पटोले बोलत होते. ज्या प्रकारे इंग्रजांचे सरकार जुलमी आणि अत्याचारी होते त्याच प्रकारे सध्याचे केंद्र सरकार आहे. असे ते म्हणाले.

केंद्रातील सरकार इंग्रजांसारखेच

नाना पटोले पुढे बोलताना मोदी सरकारची तुलना इंग्रज सरकारसोबत केली. ते म्हणाले इंग्रजही जुलूम करायचे आणि हे सरकारही जुलूम करते. दोघांत काही फरक नाही. इंग्रजांनी त्यावेळी टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ हा अग्रलेख लिहिला होता, त्यामुळे त्यांना अटक केली होती. आताचे सरकारही तेच करत आहे. जो कोणी सरकार विरोधात लिहितो, बोलतो त्या सर्वांना हे सरकार दाबत आहे. केंद्र सरकारने प्रसार माध्यमांचीही मुस्कटदाबी केलेली आहे.

माध्यमांवर दाबाव आणला जातोय

जे सरकारच्या विरोधात बोलत आहेत त्यांना कोणत्या न कोणत्या कारणाने सरकार त्यांच्यावर कारवाई करत आहे. घटनेने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली होताना दिसतेय. जेथे अन्याय दिसेल त्याविरोधात आवाज उठवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने लोकशाहीच्या चार स्तंभाची काय अवस्था करून ठेवलीय हे तर सर्वांनाच माहिती आहे. मीडियावर दबाव आणून विशिष्ट विचारसारणी पेरली जात आहे. हिंदू-मुस्लिम द्वेष वाढवला जात आहे. हे सरकर मोठ्या कष्टाने मिळालेल्या स्वातंत्र्याला गालबोट लावण्याचे काम करत असल्याचे नाना पटोले म्हणाले.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कॉंग्रेसच्या  योगदानाचा संदर्भ देऊन पटोले म्हणाले की,  “स्वातंत्र्यपूर्व काळात कॉंग्रेसने जुलमी, अत्याचारी व हुकूमशाही राजवटीविरोधात मोठा लढा दिला. सुरुवातीला लोकमान्य टिळक यांच्या जहाल व महात्मा गांधींच्या मवाळ अशा दोन्ही मार्गांनी या लढ्यात असंख्य स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु असलेली ब्रिटिश राजवटीची हुकूमशाही प्रेरणादायी चळवळीच्या माध्यमातून उलथवून टाकून कॉंग्रेसने नंतर या देशात लोकशाही व धर्मनिरपेक्ष व्यवस्था रुजवली.

त्यामुळे केंद्र सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी व नवीन पिढीला कॉंग्रेसचा इतिहास कळावा म्हणून ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे अभियान स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत पदार्पण करत असताना संपूर्ण राज्यभर राबविले जाणार आहे. या अभिमानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा’, असे आवाहन पटोले यांनी केले.

Comments are closed.