Take a fresh look at your lifestyle.

पोलीस महानिरीक्षकाकडून संदीप मिटके यांचे कौतुक

नगर, : राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी स्वताच्या जीवाची पर्वा न करता ओलीस ठेवलेल्या कुटुंबाची  अतिशय प्रसंगावधान राखून सुटका केली. आरोपीने गोळीबार करूनही मिटके यांनी धाडसाने कारवाई पूर्ण केली. या कामगिरीबद्दल आज नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक  बी.जी.शेखर यांनी नगर येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात मिटके व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.

राहुरी तालुक्यातील डीग्रस येथे निलंबित पोलिस निरीक्षकाने पिस्तुलाचा धाक दाखवून एका मुलाला ओलीस ठेवले होते. क्या घटनेत पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी प्रसंगावधान राखून संबंधित मनातील सुटका केली मात्र यावेळी आरोपी नेमके यांच्यावर गोळीबार केला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून मिटके यातून वाचले असे असले तरी त्यांच्या धाडसाचे नगर जिल्ह्यात काल पासून कौतुक होत आहे. आरोपीने एक गोळी फायर केली.

परंतु मिटके यांनी पिस्तुलाच्या बॅरल गच्च पकडून जमिनीचे दिशेने ठेवल्याने गोळी संदीप मिटके यांचे डाव्या पायाच्या पॅन्टला घासून गेली. तेवढ्यात तेथे उपस्थित असलेल्या पथकाने संदीप मिटके यांचे मदतीस येऊन आरोपी जेरबंद करून त्यास ताब्यात घेतले.सदरची कारवाई अतिशय संयमाने  ओलीस ठेवलेल्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी व स्वतःच्या जीवाची पर्वा न  करता पोलीस खात्याची मान आदराने उंचावेल अशी कामगिरी केल्याने .B.G.शेखर पाटील यांनी Dy.S.P.संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक केले.

Comments are closed.