Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाच्या डेल्टा स्वरूपापेक्षा डेल्टा प्लस स्वरूप किती धोकादायक आहे? तज्ञांनी दिली माहिती; ऐकून धक्का बसेल

नवी दिल्ली: महाराष्ट्रात सापडणार्‍या कोरोना रुग्णांमध्ये डेल्टा प्लस स्वरूपाचेही रुग्ण सापडत आहेत. अलीकडील अहवालानुसार, राज्यात डेल्टा प्लस प्रकारातील रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळ आणि महाराष्ट्रात आढळलेल्या बहुतेक प्रकरणांमध्ये डेल्टा स्वरूपांची पुष्टी झाली आहे. अशा परिस्थितीत, आतापर्यंत सांगितल्या जाणाऱ्या सर्वात धोकादायक डेल्टा स्वरुपाच्या तुलनेत डेल्टा प्लस प्रकार किती धोकादायक आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 66 रुग्ण आणि 5 मृत्यू

महाराष्ट्रात आतापर्यंत जीनोम सिक्वेंसींगद्वारे डेल्टा प्लस व्हेरियंटचे 66 रुग्ण सापडले आहेत, तर पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांचा देखील समावेश आहे. अशा परिस्थितीत, डेल्टा प्लस स्वरूप डेल्टा स्वरूपापेक्षा अधिक धोकादायक असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, यावर जीनोम सिक्वन्सिंग करणाऱ्या शास्त्रज्ञांचे मत वेगळे आहे.

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) च्या प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गीतावाणी यांनी सांगितले की, “डेल्टा आणि डेल्टा प्लस स्वरूपाबाबत अनेक संशोधन करण्यात आले आहेत. या दरम्यान, डेल्टा प्लस व्हेरियंटची पसरण्याची क्षमता किती आहे आणि डेल्टा प्रकारापेक्षा कमी आहे की जास्त? हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.”

जर आपण आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर, जरी डेल्टापेक्षा जास्त धोकादायक असल्याची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी कोरोनाचा डेल्टा प्लस स्वरूप देखील डेल्टाप्रमाणे मोठा धोका निर्माण करू शकतो.. म्हणजेच, त्याचा प्रसार दर डेल्टा प्रकारापेक्षा जास्त नाही. डेल्टा प्लस स्वरूप डेल्टा स्वरूपाएवढाच धोकादायक असू शकतो. असेही डॉ. गीता यांनी सांगितले.

तिसर्‍या लाटेसाठी डेल्टा प्लस स्वरूप जबाबदार असेल की नाही सांगणे अवघड!

डॉ गीता यांनी पुढे सांगितले की, की सध्या तिसऱ्या लाटेबद्दल फक्त अंदाज लावला जात आहे. देशात केलेल्या जीनोम सिक्वेंसींगमध्ये, केंद्र सरकारच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की सध्या सापडलेल्या नवीन कोरोना रूग्णांमध्ये अधिकांश डेल्टा ची प्रकरणे आढळून येत आहेत. त्याचबरोबर, काही दिवसांपासून आता डेल्टा प्लसचीही काही प्रकरणेही समोर येत आहेत. तथापि, या दोन्ही स्वरूपांमुळे किंवा डेल्टा प्लस प्रकारांमुळे तिसरी लाट येईल की नाही हे सांगणे अद्याप कठीण आहे. कोरोना विषाणू सातत्याने बदलत आहे, त्यामुळे कोणते स्वरूप किती धोकादायक असेल हे सांगणे कठीण आहे.

Comments are closed.