Take a fresh look at your lifestyle.

भाजपचे मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया, जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई: महाराष्ट्रात दही हंडी, गणेशोत्सव इत्यादींचे आयोजन करू देण्यासाठी आणि मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी  सुरु असलेल्या आंदोलनाविषयी   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसे या पक्षांना आधारेवर धरले. उद्धव  ठाकरे म्हणाले, “केंद्र सरकारने तिसऱ्या कोविड लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात दही हंडी, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी होणाऱ्या गर्दीवर बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. गर्दी जमत राहिली तरकोरोनाची  तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येण्याची शक्यता केंद्राने वर्तवली आहे. जे लोक आंदोलन करत आहेत त्यांना हे पत्र दाखवले पाहिजे.”

मंदिरे उघडण्याला परवानगी दिली नाही म्हणून भाजपचा विरोध 

महाविकास आघाडी सरकारने राज्यात अजूनही मंदिरे उघडण्याची परवानगी दिली नसल्यामुळे विरोधी पक्ष भाजप आणि मनसे पक्षातील कार्यकर्त्यांनी आज राज्यभरात विरोध प्रदर्शन केले. मात्र, आंदोलनादरम्यान बऱ्याच ठिकाणी कोरोनाचे नियम पाळण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.

भाजपच्या आध्यात्मिक आघाडीतर्फे पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, पंढरपूर, औरंगाबाद आणि इतर ठिकाणी निदर्शने आयोजित करण्यात आली जिथे आंदोलकांनी घंटा आणि शंख वाजवले. पुणे आणि औरंगाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी बंद मंदिरांमध्ये जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना रोखले.

‘दही हंडी’ आयोजित केल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
मंगळवारी, कोविड -१९ नियमांचे उल्लंघन करून मध्य मुंबईच्या वरळी भागात ‘दही हंडी’ आयोजित केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) चार कार्यकर्ते आणि इतर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मनसे ठाणे-पालघर युनिटचे प्रमुख अविनाश जाधव यांना दही हंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी मागण्यासाठी केलेल्या निदर्शनामुळे त्यांना आदल्या दिवशीच अटक करण्यात आली. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. रात्री उशिरा आयोजित दही हंडी कार्यक्रमात ते उपस्थित होते.

अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हिंदू मते मिळवून शिवसेना सत्तेवर आली, पण त्यांनी हिंदू सणांचे कार्यक्रम थांबवून समाजाचा विश्वासघात केला आहे. तसेच निर्बंध असले तरीही आम्ही सण साजरे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी दोन आठवड्यांपूर्वीच याबाबत भाष्य केले होते 

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यातच दही हंडी कार्यक्रमाच्या आयोजकांना सांगितले होते की, कोरोना विषाणूच्या संसर्गापासून पूर्णपणे मुक्त होईपर्यंत सणांचे आयोजन न करता आपण एक आदर्शइतर राज्यांसमोर ठेवावा .  महामारीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. असेही ते म्हणाले होते.

Comments are closed.