Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे.. तर ‘या’ दिवसापासून राज्यात पुन्हा लागेल लॉकडाउन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला इशारा

मुंबई: राज्यात मागील आठवड्यापासून कोविड निर्बंधात शिथिलता लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतका होता. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिकृतरित्या घोषणा केली होती.

तर या दिवशी पुन्हा लागेल लॉकडाउन
दरम्यान, निर्बंध शिथिल झाल्याच्या एक आठवड्यातच मुख्यमंत्र्यांनी पुन्हा लॉकडाउन लावण्याविषयी मोठे वक्तव्य केले आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती अजूनही आहे. त्यामुळे जर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोरोना संसर्ग पुन्हा मोठ्या प्रमाणात पसरला तर रुग्ण संख्या वाढेल. जर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली तर तत्काळ संपूर्ण राज्यात पूर्ण लॉक डाउन।लावण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

भाजपवर केली अप्रत्यक्ष टीका

तसेच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे नाव घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल. राज्यात अशाच जर रॅली सुरू राहिल्या तर कोरोनाची सध्या भाजप राज्यभरात जन आशीर्वाद यात्रेच्या नावाने मोठ्या सभा आणि रॅली काढत आहेत. सभांना होणाऱ्या गर्दीमध्ये कोरोनाच्या नियम पाळले जात नाहीत.

मुख्यमंत्री आज मुंबई महानगरपालिका द्वारे लहान मुलांसाठी उभारलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते.

लहान मुलांमध्ये कोविड पसरू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे

इतर देशात लहान मुलांमध्ये वाढत आहे कोरोना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लहान मुलांसाठी उभारलेल्या कोविड सेंटरविषयी बोलताना म्हणाले की, इतर देशांमध्ये कोविड लहान मुलांमध्ये सुद्धा पसरत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून इथेही लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभारले आहे. मुलांमध्ये कोविडचा संसर्ग वाढणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. तसेच जर मुलांना कोविड उपचारासाठी दवाखान्यात ऍडमिट करण्याची वेळ आलीच तर त्यांना रुग्णालयात चांगले वातावरण मिळावे म्हणून खास मुलांसाठी असे कोविड केअर सेंटर उभारत असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकीय आणि धार्मिक संघटनांना केलं आवाहन
राज्यात अनेक ठिकाणी मी गर्दी पाहतोय. दुसरी लाट अजून पूर्ण संपली नाही.निर्बंध शिथिल केले याचा अर्थ कोविड नियमांची पायमल्ली करायची असा होत नाही. राज्यातील अर्थचक्र सुरळीत सुरू राहावे म्हणून शिथिलता दिली आहे. याचा राजकीय आणि धार्मिक संघटनेचे नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापर करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Comments are closed.