Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सेलूत आनंदोत्सव ! परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी

सेलू (डाॅ विलास मोरे) :- परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ता 17 सप्टेंबर रोजी सकाळी एका न्यूज चॅनलवरून करताच सेलू येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर फटाक्यांची आतिशबाजी करत एकमेकांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.

परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी मागणी परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी लाऊन धरली होती. याकरता सर्व पक्षांनी एकत्र येऊन सह्यांची मोहीम सुरू करून जिल्हाभर आंदोलन ऊभे केले होते. याला नागरीकांनीही मोठा प्रतिसाद दिला. राज्यात शिवशेनेचे मुख्यमंत्री आहेत तर परभणी लोकसभेचे खासदार संजय जाधव व परभणीचे आमदार डाॅ राहूल पाटील हे शिवसेनेचे आहेत.

राज्यात सत्तेवर असतानाही परभणीकरांची मागणी पुर्ण होत नसेल तर मग लोकप्रतिनिधींचा काय उपयोग ? अशी चर्चा जिल्हाभर सुरू होऊ लागली त्यामुळे खासदार, आमदारांना कंबर कसून आंदोलनात उतरावे लागले. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्रांम दिनी परभणीकरांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणी येथे शासकीय महाविद्यालय मंजूर केल्याची घोषणा करताच सेलू शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती, क्रांती चौक व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ फटाक्यांची आतिशबाजी करत मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी नगराध्यक्ष विनोद बोराडे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक रणजित गजमल, जिल्हा परिषदेचे सदस्य अशोक काकडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, शिवशेना जिल्हा संघटक मंगलताई कथले, संदीप लहाने, रमेश डख, सुधाकर पवार, मनिष कदम, मिलिंद सावंत, अविनाश शेरे, विठ्ठल कारके, अण्णा लोकुलवार, वैभव वैद्य, हरी काळे, संपत शेरे, अर्जुन बोरूळ आदींची उपस्थिती होती….

Comments are closed.