Take a fresh look at your lifestyle.

चला हवा येऊ द्याचे कलाकार एवढे घेतात मानधन; भाऊ कदमचे मानधन पाहून व्हाल चकित

चला हवा येऊ द्या हा मराठीतील एकमेव असा शो आहे जे घरातील प्रत्येक व्यक्ती बघत असतो. गेली सहा वर्ष महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे की मराठी सोबत हिंदी कलाकार सुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात.

आता आपल्याला खळखळून हसवणारे हे कलाकार नेमकं किती मानधन घेतात, हे आज आपण जाणून घेणार आहोत. ‘चला हवा येऊ द्या’चा लेखक, दिग्दर्शक आणि निवेदक असणारा निलेश साबळे अंदाजे सव्वा लाख रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे. पत्र घेऊन येणारे पोस्टमन काका म्हणजे सागर कारंडे अंदाजे ७० हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.

भाऊशिवाय ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम पूर्ण होणं अशक्य आहे. सर्वांचा लाडका असलेला हा अभिनेता जवळपास अंदाजे ८० हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे. कोणत्याही भूमिका लिलया साकारणारा अभिनेता कुशल बद्रीके अंदाजे ७५ हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे. विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे अंदाजे ७५ हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.चुलबुली अभिनेत्री श्रेया बुगडे अंदाजे ८० हजार रुपये मानधन घेते, अशी माहिती मिळते आहे.

Comments are closed.