Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे…केंद्राने पुन्हा कोरोना निर्बंधात केली वाढ; जारी केला आदेश, जाणून घ्या सविस्तर माहिती

नवी दिल्ली: देशात कोरोंनाची दुसरी लाट ओसरत असताना अनेक राज्यांनी कोरोना निर्बंधात शिथिलता दिली. अर्थचक्र सुरू राहण्यासाठी निर्बंधात शिथिलता देणे महत्वाचे होते. मात्र, शिथिलता मिळाल्यानंतर नागरिक कोरोनाचे नियम पाळताना दिसत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी बरेच लोक विना मास्क फिरताना दिसत आहेत. परिणामी कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. 

सणासुदीमुळे रुग्णसंख्या परत वाढण्याची शक्यता

देशभरात सध्या सणासुदीचे दिवस आहेत. येत्या काळातही अनेक मोठे सण असल्यामुळे पुन्हा गर्दी वाढून कोरोंनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येण्याची चिंता वाढली आहे. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात ओणम सण साजरा केला जातो. मागच्या वर्षी हा सण साजरा  करता न आल्यामुळे या वर्षी ओणम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. त्यामुळे केरळमधील कोरोनाची  स्थिती फार भयंकर बनली असून तिथे रोज 30 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. 

महाराष्ट्रातील काही जिल्हयात कोरोनाने परत डोके वर काढले असून, प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. येणार्‍या काही दिवसात गणपती उत्सव असल्यामुळे राज्यात कोरोना वाढण्याची तज्ञांनी भीती व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केरळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू नये म्हणून गणेशोत्सवात लोकांची गर्दी जमण्यावर कडक निर्बंध लावण्याच्या सूचना राज्य सरकारला दिली आहेत.

या राज्यांतील परिस्थिती चिंताजनक

महाराष्ट्र आणि केरळ सह, तमिळनाडू, करणटक, आंदता प्रदेश, ओडिसा या राज्यांत कोरोना रुग्णवाढ जास्त आहे. देशातील एकूण रुग्णांमधील बहुतांश रुग्ण याच राज्यातून येत आहेत. देशातील 41 जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी दर तब्बल 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, महाराष्ट्रात दररोज जवळपास 4,000 रुग्ण सापडत आहेत. परिणामी केंद्रसरकारने कोविड निर्बंध वाढवण्याचा आदेश जारी केला.

लहान मुलांमध्ये कोरोना वाढतोय

महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये कोरोना लक्षणीयरित्या वाढत असून, राज्यात लहान मुलांना कोरोंनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण 10 टक्के आहे. त्यामुळे पुभा कडक निर्बंध लावण्यात येऊ शकतात. सध्या राज्यात 51,500 सक्रिय रुग्ण असल्यामुळे दिवाळीपर्यंत हे निर्बंध काम ठेवण्यात येऊ शकतात. 

दरम्यान, राज्यातील पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 13,715 सक्रिय रुग्ण आहेत. यानंतर ठाणे जिल्ह्यात 7082, अहमदनगर मध्ये 5295 तसेच सातारा आणि सांगली मध्ये अनुक्रमे 5254 आणि 4876 सक्रिय रुग्ण आहेत. 

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असला तरी कोविड नियमावली पाळणे गरजेचे आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू असून, दोन डोस घेणार्‍या नागरिकांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. 

Comments are closed.