Take a fresh look at your lifestyle.

बाब्बोव… मारुती सुझुकीला मोठा धक्का; भरावा लागेलतब्बल 200 कोटींचा दंड, कारण ऐकून विश्वास बसणार नाही

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाला (Maruti Suzuki India) मोठा धक्का बसला आहे.  भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (CCI) मारुती सुझुकी इंडियाला बेकायदेशीर व्यवहारात सहभागी असल्याचे कारण देत 200 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. CCI सर प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहार पद्धतींना प्रतिबंधित करते.

नेमकं काय आहे प्रकरण?

CCI ने केलेल्या आरोपांनुसार, मारुती सुझुकी इंडियाने त्यांच्या डीलर्सना गाड्यांवर सूट देण्यास भाग पाडले. सीसीआयने 2019 मध्ये आरोपांची चौकशी सुरू केली होती. तपासाच्या आधारे 23 ऑगस्ट रोजी हा आदेश जारी करण्यात आला.

भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने आपल्या 10 पानांच्या अहवालात आरोप केला आहे की, मारुती सुझुकी इंडियाच्या डीलर्सना त्यांच्या ग्राहकांना एका विशिष्ट प्रदेशात अतिरिक्त सूट देण्याची परवानगी नाही आणि जर एखादा डीलर अनुज्ञेय पातळीपेक्षा जास्त सूट देत असेल तर तो दंडनीय अपराध आहे.

ग्राहक समाधान आणि धोरण एकसमानता यांच्यात संतुलन राखण्याव्यतिरिक्त, आम्ही डीलर्सवर नियंत्रण किंवा देखरेख करत नाही. या व्यतिरिक्त, डीलरशिप करारामध्ये असे कोणतेही कलम नाही, ज्या अंतर्गत व्यापाऱ्यांना निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सूट दिल्याबद्दल दंड आकारला जाईल, असे मारुती सुझुकी इंडियाने आपल्या उत्तरात म्हटले आहे.

Comments are closed.