Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे! 2025 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची होऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

नवी दिल्ली: मागील वर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय अर्थव्यवस्था 2025 पर्यंत 5,000 अब्ज डॉलरची (5 Trillion Dollar economy) बनवण्याचे मोदी सरकारचे ध्येय असल्याचे जाहीर केले होते. मात्र हे लक्ष्य पूर्ण होणे कठीण असल्याचे दिसत आहे.

कोरोना विषाणूच्या साथीमुळे व्यावसायिक क्रियाकलाप (Business Activities) थांबल्याने झालेल्या आर्थिक मंदीमुळे, 2024-25 या आर्थिक वर्षापर्यंत भारताची 5,000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्याची शक्यता दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षापर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेला 5,000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तथापि, देशातील अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे लक्ष्य निर्धारित कालावधीत साध्य करणे खूप कठीण आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेपेक्षा भारताची आर्थिक घसरण वेगाने

भारतीय अर्थव्यवस्था 2019 च्या तुलनेत पुढील आर्थिक वर्षात खूपच लहान असेल. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या सध्याच्या विकासदराच्या अंदाजानुसार सर्व काही चालू असले तरी, 2019 च्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था पुढील वर्षी कमी राहील. असा मॅसॅच्युसेट्स विद्यापीठाचे प्राध्यापक वामसी वकुलाभरणम यांचा अंदाज आहे.

ते पुढे म्हणाले की, “आर्थिक मंदीचे सर्वात महत्वाचे कारण कोविड -19 महामारी आहे. यामुळे, इतर विकसनशील देशांच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारताची आर्थिक घसरण खूप वेगाने होत आहे.”

पुढील 4 वर्षांसाठी वार्षिक 13% दराने अर्थव्यवस्थेत वाढ करावी लागेल

अर्थतज्ज्ञ वकुलाभरणम म्हणाले की, सध्या भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) आकार $3,000 अब्ज पेक्षा कमी आहे. जर पुढील चार वर्षांत ती $5,000 पर्यंत पोहचवायची असेल तर अर्थव्यवस्था सरासरी 13 टक्क्यांहून अधिक वार्षिक दराने वाढवावी लागेल. मात्र, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि रिझर्व्ह बँकेने अलीकडेच विकासदराचा अंदाज कमी केला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालय (सीएसओ) च्या ताज्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अर्थव्यवस्थेत 7.3 टक्के घट झाली आहे. आरबीआयच्या मते, चालू आर्थिक वर्षात विकास दर जास्तीत जास्त 9.5 टक्के असेल.

Comments are closed.