Take a fresh look at your lifestyle.

फक्त दीड लाखात सुरू करा हा व्यवसाय; महिन्याला होईल 50 हजार रुपयांची कमाई, सरकार देईल 90 टक्क्यांपर्यंत कर्ज

नवी दिल्ली : सध्याच्या काळात चांगली नोकरी मिळणे फार कठीण झाले आहे. वाढती बेरोजगारी आणि  नोकरीच्या फार कमी संधी उपलब्ध असल्याने निर्माण होणार्‍या जीवघेण्या स्पर्धेमुळे लाखो तरुण नैराश्यात जात आहेत. उपजीविकेचे साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी शेकडो बेरोजगार आत्महत्या करण्यापर्यंत विचार करत आहेत. मात्र, कितीही वाईट परिस्थिती आली तरी न डगमगता संघर्ष करणार्‍या व्यक्तींना नक्कीच एक न एक दिवस यश प्राप्त होत असते.

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात उतरावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी सरकार अनेक योजना घेऊन येत असते. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा व्यवसायबद्दल सांगणार आहोत, ज्याने कमी भांडवलात महिन्याला 50 हजार रुपयापर्यंत कमाई करता येऊ शकते.

जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे कारण आज आम्ही तुम्हाला एका खास व्यवसाय योजनेबद्दल सांगत आहोत, जो व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीत सुरु करता येईल. हा सोया दूध बनवण्याचा व्यवसाय आहे. हा सुरू करण्यासाठी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाकडून (एनएसआयसी) प्रशिक्षणही दिले जाईल.

90 टक्के कर्ज मिळेल

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारच्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (पीएमईजीपी) 90 टक्क्यांपर्यंत कर्जही उपलब्ध होईल. जर तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी फक्त एक लाख रुपये जरी  असतील तर तुम्ही सोया दूध बनवण्याचे युनिट सुरू करू शकता.

उत्पादन खर्च

एनएसआयसीच्या प्रकल्प अहवालात, सोया दूध बनवणाऱ्या युनिटची एकूण किंमत 11 लाख रुपये आहे. या प्रकल्प अहवालाच्या आधारावर बँकेकडून मुद्रा लोण घेता येऊ शकते. बँक तुम्हाला 80 ते 90 टक्के कर्ज देत आहे आणि तुम्हाला जवळपास 1.50 लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल.

एनएसआयसी देईल पूर्ण प्रशिक्षण

राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने (NSIC) देशाच्या विविध भागात तांत्रिक सेवा केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांमधून तुम्हाला अनेक प्रकारच्या व्यवसायाचे तसेच नोकरीभिमुख अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये तुम्हाला सोया दूध बनवण्याचे पूर्ण प्रशिक्षण मिळेल. तसेच, उद्योजकता विकास कार्यक्रम (ईडीपी) अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यापासून, व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण, विपणन देखील शिकवण्यात येईल.

प्रकल्पासाठी किती जागा आवश्यक आहे?

एनएसआयसीच्या अहवालानुसार, सोया दूधचे छोटे युनिट उभारण्यासाठी 100 चौरस मीटर जागेची आवश्यकता असेल. यामध्ये, संरक्षित क्षेत्र फक्त 75 चौरस मीटर आहे. ते भाड्याने घेता येऊ शकते.

यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये गुंतवणूक

सोया दूध व्यवसायासाठी आपल्याला एक ग्राइंडर, कुकर, बॉयलर, मेकॅनिकल फिल्टर प्रेस, टोपो बॉक्स, यंत्र आणि सोकिंग टॅंक इत्यादि उपकरणांची गरज लागेल.

उत्पादन प्रक्रिया

सोयाबीनच्या दाण्यांना सोयाबीनपेक्षा तीन पटीने जास्त गरम पाण्यात 4 ते 6 तास भिजवावे लागेल. यानंतर, ते 8 ते 12 तास थंड तापमानात ठेवावे लागतील. नंतर भिजवलेले सोयाबीन ग्राइंडर आणि कुकिंग मशिनमध्ये ठेवून 120 डिग्री तापमानात 10 मिनिटे ठेवावे लागेल. यानंतर, आपण आउटलेट वॉल  उघडून आपल्या सोयीनुसार दूध पॅक करू शकता.

किती होईल कमाई?

या संपूर्ण सेटअपसह, तुम्ही 1 लाख 75 हजार लिटर सोया दूध बनवू शकता जे 30 रुपये प्रति लीटरने विकले जाते. यामुळे तुम्हाला 50 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकेल. म्हणजेच, सर्व खर्च काढून, तुम्ही सोया दूध बनवण्याच्या व्यवसायातून प्रचंड नफा कमवू शकता.

Comments are closed.