Take a fresh look at your lifestyle.

देवगावफाटा- सेलू रस्त्यावर बोलेरो पिकअपला अपघात

सेलू :- तालुक्यातील देवगाव फाटा येथून एक किमी अंतरावर रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात ७ प्रवासी जखमी झाले तर गाडी (क्रं एम.एच.38 एक्स 0340) चे मालक सज्जन नरोटे हे वाहनाखाली दबल्यामुळे ठार झाला आहेय. चार गंभीर रुग्णांना सेलु उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर परभणी येथे पुढील उपचारार्थ रवाना करण्यात आले असल्याची माहिती डॉ. सविता साडेगावकर यांनी दिली.

याबाबतची माहिती या प्रमाणे जिंतूर तालुक्यातील कोरवाडी, कवडा येथील १० प्रवासी मजुर या वाहनांमधून बीड येथे जात असताना देवगाव फाटा पासून एक किमी अंतरावर हा अपघात झाला. तत्पूर्वी कवडा ते देवगाव फाटा हे वाहन गाडीचा मालक सज्जन नरोटे यांनी सुरक्षितपणे चालवत होता. सोबत घेतलेल्या देवगाव फाटा येथील चालकाने हातात वाहन घेऊन चालवत असताना हा अपघात झाल्याचे या वाहनातील जखमी प्रवासी रवी चव्हाण यांनी सांगितले. या वाहनात एकूण १० प्रवासी होते.

अपघातानंतर वाहन मालक जागीच ठार झाला असून उर्वरित जखमींना घेऊन चारठाणा पोलिसांनी आपल्या वाहनातून सेलु उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल केले. या मध्ये जखमी झालेल्यांची नावे या प्रमाणे काजल लहू आढे (वय२०वर्षे), मयुरी रवी चव्हाण (वय१३वर्षे), पृथ्वीराज रवी चव्हाण (वय१६वर्षे), विजय श्रीराम राठोड (वय३४वर्षे), नीता विजय राठोड (वय३०वर्षे), प्रियंका भारत राठोड (वय२०वर्षे), काजल दतराव आढे (वय२२वर्षे), आचल दतराव आढे (वय ६ महिने), मालती रवी चव्हाण (वय २७ वर्षे) राहणार कोरवाडी, कवडा, हंडीअदी येथील आहेत. सात जखमी मजुरा पैकी मयूरी चव्हाण, काजल आढे यांची प्रकृती गंभीर आहे तर पृथ्वीराज चव्हाण, विजय राठोड या दोघांनाही मोठ्या जखमा झाल्या आहेत.

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.