Take a fresh look at your lifestyle.

प्रेरणादायक: ‘या’ आमदाराने केले असे काही की, म्हणाल आमदार असावा तर असा!

ठाणे: देशात कोरोनाच्या दोन्ही लाटेने अक्षरशः धुमकाळ घातलेला आहे. लाखो लोकांना जीव गमवावा लागला, करोडो लोकांचा रोजगार गेला. तसेच करोडो लोकांना घर चालवण्यासाठी अडचणी येत आहेत. या काळात अनेक राजकारण्यांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या. मात्र आमदार गणपत गायकवाड याला अपवाद आहेत. त्यांनी राजकारणी कसा असावा याचे आदर्श उदाहरण लोकांसमोर ठेवले आहे.

देशात कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे. सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत लसीकरण केले जात आहे. मात्र, जास्त लोकसंख्या लसींचा तुटवडा जाणवत आहे. बर्‍याच लोकांना खाजगी दवाखान्यातून लस विकत घेणे परवडत नाही.

दरम्यान, भाजपा आमदार यांनी त्यांच्यामार्फत मोफत लसीकरण सुरू केले आहे. त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नाचा खर्च टाळत नागरिकांचे लसीकरण करण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी आजपासून कल्याणमध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे. या उपक्रमातून आमदार गणपत गायकवाड यांनी कोरोना संकटकाळात समाजापुढे नवा आदर्श उभा केला आहे.

मे महिन्यात्च केली होती घोषणा:

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे लग्न साधेपणाने करण्याचे ठरवले होते. त्याचवेळी त्यांनी या लग्नाचा खर्च टाळून त्या पैशातून नागरिकांचे लसीकरण करण्याचे ठरवले होते. त्यानुसार आजपासून कल्याणमध्ये लसीकरण सुरू झाले आहे.

2 हजार नागरिकांना देण्यात येणार लस

आमदार गायकवाड यांच्यामार्फत सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत परिसरातल्या 2000 नागरिकांना मोफत लसी देण्यात येणार असून, हे लसीकरण 3 दिवस चालणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने रिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिला, लॉण्ड्रीचालक यांना प्राधान्य दिले जाणार आहे. लसीकरण मोहीमेच्या शुभारंभाला आ. गणपत गायकवाड यांच्यासह भाजप शहराध्यक्ष संजय मोरे, मनोज राय, मोरेश्वर भोईर हे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.