Take a fresh look at your lifestyle.

‘खावाले काळ, नी भुईला भार हे ठाकरे सरकार’, ‘या’ नेत्याने केली ठाकरे सरकारवर खोचक टीका

नंदुरबार: ठाकरे सरकार सध्या जनहिताच्या विषयांकडे साफ दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे ‘खायला काळ, नी भुईला भार हे ठाकरे सरकार’. असच ठाकरे सरकारचं वर्णन करावे लागेल म्हणत खास अहिराणी भाषेत आशीष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. आज पासून सुरू झालेल्या तीन दिवसीय उत्तर महाराष्ट्र दौर्‍यावर असताना आशीष शेलार यांनी ही खोचक टीका केली.

कमिशन खाण्यासाठी हे तीन पक्ष आले एकत्रित…

या दौर्‍यात त्यांनी आज नंदुरबारमध्ये पक्षाचा संघटनात्मक आवाहल घेत पत्रकारांशी संवाद साधला. आज त्यांनी नंदुरबारमधील लोकांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच पत्रकारांशी बोलत असताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हे सरकार एका अभद्र युतीतून तयार झाले असून, फक्त कंत्राटावरचे कमिशन खाण्यासाठी एकत्र आलेले हे सरकार आहे असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

नंदुरबारच्या दुष्काळ परिस्थिती वर सरकार काय नियोजन करणार?

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 20 जुलैपर्यन्त जिल्ह्यातील 3 लाख हेक्टर शेतीपैकी पैकी 1 लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. मात्र, पाऊस न झाल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचं संकट आले आहे. दुबार पेरणीसाठी बँक पीक कर्ज देण्यासाठी हात आखडता घेत आहेत. त्यामुळे 20 हजारपेक्षा जास्त खातेधारकांनी पीक कर्ज घेतलेले नाही. जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर त्याचे नियोजन हे सरकार कधी करणार? असा प्रश्नही शेलार यांनी विचारलाय.

सरकार पॅकेज तर घोषित करते मात्र ते गरजूंपर्यंत पोहचत नाही

आज ठाकरे सरकार ने पूरग्रस्त भागातील झालेली नुकसानीसाठी तब्बल 11 हजार 500 कोटीचे पॅकेज जाहीर केले. यावर बोलताना आशीष शेलार म्हणाले की, “मुख्यमंत्री तर म्हणाले होते मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे पॅकेज देणारा नाही, मग मुख्यमंत्र्यांनी शब्द का फिरवला? याअगोदरही तौक्ते आणि निसर्ग वादळाच्या वेळी पॅकेज जाहीर झाले होते पण ते गरजूंपर्यंत पोहोचले नाहीत. आता काही दिवसांपूर्वी केलेली तातडीही 10 हजारची मदत सुद्धा मिळाली नाही. मदत घोषित होते मात्र ती पोहचत नाही.”

Comments are closed.