Take a fresh look at your lifestyle.

अबब…2024 विधानसभा निवडणुकी देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी भविष्यवाणी, म्हणाले भाजप…

पुणे: माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 मध्ये होणार्‍या निवडणुकीसाठी आताच मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी भाजप आणि शिवसेना युतीबाबत बषया केले. तसेच महाविकास आघाडी सरकारवर टीकाही केली.

शिवसेनेसोबत युती असल्याने भाजपा राजकीय समर्थन वाढवू शकली नाही

शिवसेनेसोबतच्या युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक विधान केले. ते म्हणाले, शिवसेनेसोबत युती असल्याने भारतीय जनता पक्ष पूर्वी आपला राजकीय आधार वाढवू शकला नाही, परंतु युती तुटल्यानंतर भाजपचे राज्यातील राजकीय समर्थन वाढत असून, 2024 साथी भाजपला सुवर्ण संधी आहे. 2024 मध्ये भाजप एक हाती सत्ता मिळवेल अशी भविष्यवाणीही त्यांनी यावेळी केली.

शिवसेना नेता आशा बुचके यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

आता शिवसेनेने भाजपशी संबंध तोडले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले, त्यामुळे भाजपला राज्यात आपला पाया विस्तारण्याची सुवर्ण संधी असल्याचे ते म्हणाले. पुणे जिल्ह्यातील शिवसेना नेत्या आशा बुचके यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. त्याच प्रसंगी फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले, “”युतीमध्ये (शिवसेनेसोबत) असल्याने भाजप पूर्वी राज्यात विस्तार करू शकला नाही. आता तीन पक्ष सत्तेत आहेत आणि भाजपला राज्यात आपला पाया विस्तारण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे 2024 मध्ये भाजप आपल्या दमावर एक हाती सत्ता स्थापन करेल.”

सत्ताधारी तीन पक्षांची घुसमट होत आहे

शिवसेना नेता आशा बुचके यांच्या भाजप प्रवेशावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत सत्तेतील घटक पक्षांची घुसमट होत असल्याचे म्हणाले.

“तीन सत्ताधारी पक्ष गुदमरलेले आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या  पक्षाच्या (शिवसेना) नेत्या आशा बुचके यांचे भाजपमध्ये येण्याचा निर्णय अगदी स्वागतार्ह आहे.” असे फडणवीस म्हणाले.

यापूर्वीसुद्धा भाजप-सेना युती तुटली होती

भाजप आणि शिवसेना यांच्य पहिल्यांदा 1980 मध्ये युती झाली होती. 2014 मध्ये युती थोडक्यात तुटली आणि दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढल्या होत्या.

2014 च्या उत्तरार्धात शिवसेना पुन्हा भाजपमध्ये सामील झाली आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले होते. दोन्ही पक्षांनी 2019  मध्ये एकत्र विधानसभा निवडणुका जिंकल्या. पण शिवसेना आणि भाजप दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी निर्माण झालेल्या वादातून शिवसेनेने  मार्ग काढला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केले.

Comments are closed.