Take a fresh look at your lifestyle.

माजी मंत्री राम शिंदे यांना दुसरा धक्का…नामदेव राउतानी पक्ष सोडला

नगर : कर्जत येथे भाजप युवा मोर्चा व ओबीसी सेलच्या वतीने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या बरोबर कर्जतमधील नगरपरिषदेचे पहिले अध्यक्ष व माजी मंत्री राम शिंदे यांचे विश्वासू नामदेव राऊतही होते. पण काल राम शिंदे बरोबर दिसलेल्या राऊत यांनी आज अचानक भाजपला अखेरचा रामराम केल्याची घोषणा केली.

नामदेव राऊत व प्रकाश ढोकरीकर हे कर्जतच्या राजकारणातील मोठे नेते मानले जातात. हेच नेते गमावल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. राऊत यांनी त्यांचा राजीनामा अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्याकडे पाठवून दिला आहे. विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांच्या पराभवापासून कर्जत तालुक्यात भाजपची ताकद कमी होऊ लागल्याचे बोलले जात आहे.

कर्जत नगरपरिषदेची लवकरच निवडणूक आहे. त्यादृष्टीने कर्जतमधील राजकीय हलचालींना वेग आला आहे. नामदेव राऊत यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला कर्जतमध्ये आणखी एक धक्का बसला आहे. निवडणुकीपूर्वी भाजपचे किती नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर जातात यावर कर्जतमध्ये राजकीय चर्चा रंगली आहे.

Comments are closed.