Take a fresh look at your lifestyle.

विज चोरीच्या प्रकारामुळे बिल भरणाऱ्या ग्राहकांना भुर्दंड ! सेलू तालुक्यात ग्रामीण भागातील प्रकार

सेलू :- तालुक्यातील ग्रामीण भागात आकडा टाकून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढले असून या वीज चोरीच्या प्रकारामुळे इतर बिल भरणाऱ्या ग्राहकांना वीज देयकाचा भुर्दंड सोसावा लागत असल्याची ओरड आहे.

सेलू तालुक्यात ग्रामीण भागातील नागरीकांचा मुख्य व्यवसाय शेती असून पाण्याचा स्रोत उपलब्धते नुसार वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न वर्षभर घेत असतात. या पिकांना लागणारी सिंचन व्यवस्था करण्यासाठी विद्युत मीटर घेतले आहेत. परंतु आपल्या आपल्याला जास्त विद्युत बिल येऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना विद्युत तारांवर आकडा टाकून विद्युत चोरी करीत असल्याचे सांगण्यात येते.

या विद्युत चोरीच्या प्रकारामुळे इतर शेतकऱ्यांच्या नावावर नाहक बोजा पडत असल्यामुळे त्यांच्या विद्युत बिलाची रक्कम फुगून येत असते. अशी विद्युत चोरी करण्याचे प्रकार अनेक दिवसांपासून सुरु असल्याचे सांगण्यात येते. दिवसा पिकांना पाणी न देता रात्रीच्या वेळी वीज चोरी करता यावी म्हणून रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्याची पद्धत सुरु करण्यात आली आहे. अशा प्रकारे विद्युत चोरी करणाऱ्यांना आळा बसावा म्हणून विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळेस तपासणी मोहीम राबवून चौकशी करावी अशी मागणी नियमित वीज बिल भरणारे शेतकरी करत आहेत.

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.