Take a fresh look at your lifestyle.

राहुल गांधीची सत्ता असती तर लसी साठी हात पसरावे लागले असते, ‘या’ नेत्याने केली राहुल गांधीवर टीका

पटणा: देशात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. परंतु, लसीच्या कमतरतेमुळे मोहीम संथ झाली आहे. असेच जर सुरू राहिले तर कोरोनाची तिसरी लाट अधिक धोकादायक ठरू शकते असे तज्ञांचे मत आहे. तिसर्‍याला लाटेला रोखायचे असेल तर लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याचे बोलले जात आहे.

लसीच्या कमतरतेवरून विरोधी पक्ष नेहमीच सरकारला जाब विचारत असतो. यावर मोठ्या प्रमाणात राजकारण केले जात आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी राहुल गांधींना टोला मारला आहे. ते म्हणाले राहुल गांधीच्या पक्षाची सत्ता असती तर भारताला इतर देशांपुढे लशीसाठी हाता पसरावे लागले असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत स्वतःच्या सरकारचे कौतुक केले होते.  मोदींनी ट्विटमध्ये लिहिले, ‘स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा भारताने साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी स्वत: लस विकसित केली आहे आणि तेही संसर्गाची माहिती झाल्याच्या एका वर्षाच्या आत.’

नरेंद्र मोदींच्या त्या ट्विटला उत्तर देताना राहुल गांधी यांनी ‘लशी कुठे आहेत”‘ हा प्रश्न विचारला. ते लसीच्या तुटवड्याबाबत बोलत होते.

यावर सुशील मोदी यांनी राहुल गांधीवर जोरदार टीका केली.  ते म्हणाले, ‘भारताच्या लसीवर आणि जगातील सर्वात वेगवान लसीकरण मोहिमेवर कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढवण्याऐवजी राहुल गांधी सतत नकारात्मक टिप्पणी करत असतात, पण जर या वेळी त्यांचे (कॉंग्रेसचे) सरकार असते, तर भारताला लशीसाठी जगापुढे हात पसरावा लागला असता.’

सुशील मोदी पुढे म्हणाले, “त्यांचे सरकार असताना पोलिओचे उच्चाटण करायला 26 वर्षे लागली होते, हे त्यांनी विसरू नये. “

Comments are closed.