Take a fresh look at your lifestyle.

अरे बाब्बो… मुंबईत सेक्सटॉर्शन रॅकेट उघड, बॉलीवूडचे शेकडो मोठे कलाकार बळी; जाणून घ्या सविस्तर

मुंबई: सध्या देशभरात ऑनलाइन फ्रॉड, ऑनलाइन खंडणी, ऑनलाइन फसवणूक इत्यादि प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सरकार सायबर गुन्हे रोखण्यासाठी जागरूकता मोहीम राबवत असते. सायबर गुन्हे करणारे लोक नेहमी नवनवीन शक्कल लढवून लोकांना फसवत असतात. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे.

बॉलीवूड स्टार्सचे अश्लील फोटो घेऊन ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्सना अश्लील फोटो-व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल करणाऱ्या एका गुन्हेगारी टोळीचा खुलासा झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यांतून चार जणांना अटक केल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत 100 हून अधिक सेलिब्रिटी त्यांना बळी पडले असल्याची माहिती समोर येत आहे. तपास यंत्रणांना भुलवण्यासाठी आरोपींनी नेपाळच्या बँक खात्यांचा वापर केला.

सेक्सटॉर्शन: म्हणजे काय ?
सेक्सटॉर्शन म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या लैंगिक क्रिया सार्वजनिक करण्याच्या आधारावर ब्लॅकमेल करणे होय. याद्वारे ते अनेक वेळा मोठी खंडणीची मागणी देखील करतात.

285 लोकांना केले ब्लॅकमेल

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सायबर सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी सांगितले की, या टोळीने आतापर्यंत 285 लोकांना बळी बनवले आहे. त्याचबरोबर गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आलेले मोबाईल आणि इतर गॅझेटचा तपास सुरू आहे. आरोपींना नागपूर, उत्तर प्रदेश, गुजरात आणि ओडिशा येथून अटक करण्यात आली. आरोपींनी मोठ्या व्यक्तींना ब्लॅकमेल करण्यासाठी सोशल मीडियावर मुलींची बनावट खाती वापरली असल्याचे दिसून येत आहे.

आरोपी आहेत इंजिनीअर

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी दोन व्यवसायाने अभियंता आहेत. तर, एकाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे. तपासादरम्यान, पोलिसांना मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससोबतच 12 बनावट खाती, 6 बनावट ई-मेल आयडी देखील सापडले आहेत.

इन्स्टाग्राम आणि स्नॅपचाटचा करायचे वापर

आरोपींनी स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून मोठ्या व्यक्तींना लैंगिक छळाला बळी पाडले. हे आरोपी संभाषणाद्वारे लोकांशी जवळीक वाढवायचे आणि त्यांना आमिष दाखवून त्यांचे अश्लील फोटो व्हिडीओ मिळवायचे.

285 पीडित लोकांपैकी 100 पेक्षा जास्त बॉलीवूड कलाकार आहेत

मीडिया रिपोर्टनुसार, सेक्सटॉर्शनला बळी पडलेल्या 285 लोकांमध्ये बॉलिवूड आणि टीव्हीचे 100 हून अधिक सेलिब्रिटी आहेत. आरोपी पीडितांचे अश्लील फोटो, व्हिडिओ ट्विटर, डार्क नेटसह विविध प्लॅटफॉर्मवर टाकण्याची धमकी देऊन लाखो रुपयांची खंडणी वसूल करायचे. याशिवाय आरोपी थेट खाजगी फोटो विकत असत. तसेच आरोपी कोणत्याही स्टारचे डार्क नेटवर लोकांच्या मागणीनुसार अश्लील व्हिडिओ पुरवत असत.

Comments are closed.