Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी: बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन, वयाच्या 40 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

 

मुंबई: मनोरंजनाच्या दुनियेतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. बिग बॉस 13 विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन झाले आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून, सध्या सिद्धार्थ शुक्लाचा मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये असून पंचनामा केला जात आहे. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी कसले तरी औषध घेऊन ते झोपले होते, पण गुरुवारी सकाळी ते उठलेच नाहीत.

मनोरंजन जगतात शोक

सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. या घटनेवर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. सर्व अभिनेते आणि अभिनेत्री सिद्धार्थ शुक्ला यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

नुकतेच बिग बॉस OTT वर दिसले होते

अलीकडेच, सिद्धार्थला करण जोहरच्या शो बिग बॉस ओटीटीमध्ये शहनाज गिलसह दाखवण्यात आले. शो च्या सेट वर त्यांनी करण जोहर आणि शो मधील सर्व सदस्यांसोबत मस्ती केली होती.

2008 मध्ये केली होती करिअरला सुरुवात

सिद्धार्थ शुक्ला यांनी 2008 मध्ये ‘बाबुल का आंगन ना छुटे ना’ या टीव्ही शोद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर, ते ‘सीआयडी’, ‘बालिका वधू’ आणि ‘लव्ह यू जिंदगी’ सारख्या टीव्ही शोमध्ये तसेच अनेक रियालिटी शोमध्ये दिसले होते.

दोन रियालिटी शो मध्ये गाजवले नाव

सिद्धार्थ शुक्ला हे टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे. त्यांनी बिग बॉस आणि खतरो के खिलाडी या रियालिटी शोज मध्ये अमाप प्रसिद्धी मिळवली होती. लहान मुलांपासून ते वृध्द असे सर्व वयोगटातील त्यांचे चाहते होते.

Comments are closed.