Take a fresh look at your lifestyle.

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण अखेर आज भरले.

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण अखेर आज (रविवारी) भरले. त्यामुळे दुपारी 11 वाजता धरणातून 3256 क्वियुसेक विसर्ग करण्यात आला आहे. दरवर्षी ९५ टक्के धरण भरल्यावर तांत्रिकदृष्ट्या धरण भरल्याचे जाहीर करुन विसर्ग केला जातो. यंदा मात्र १०० टक्के धरण भरल्यावरच विसर्ग सुरु केला. यंदा एक महिना उशिराने धरण भरले. अजूनही धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे.

नगर जिल्ह्याचे, त्यातही खास करुन अकोले, संगमनेर, श्रीरामपुर, कोपरगाव, राहाता, नेवासा तालुक्याचे भंडारदरा, निळवंडे धरणाकडे तर राहुरी, पाथर्डी, नगर, नेवासा, तालुक्यातील लोकांचे मुळा धरणातील पाणीसाठ्याकडे लक्ष असते. दरवर्षी १५ आॅगस्टच्या आत भरणारे भंडारदरा धरण यंदा एक महिना उशिराने भरले आहे. ९५ टक्के धरण भरल्यावर तांत्रिकदृष्ट्या धरण भरल्याचे जाहीर करुन विसर्ग केला जातो.

यंदा मात्र १०० टक्के धरण भरल्यावरच विसर्ग सुरु केला. आज सकाळी आठवाजता धरणात ९९ टक्के पाणी साठा झाल्यानंतर दुपारी वाजता धरणाच्या 3256 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. भंडारदरातून सोडलेले पाणी आता निळवंडेत येत आहे. निळवंडे धरणही ८४ टक्के भरलेले असून केवळ दिड टीएमसी पाण्याची गरज आहे. साधारण एक दिवसात धरण भरेल. त्यानंतर निळवंडेतूनही प्रवरा नदीत विसर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. दरम्याण प्रवरा नदीकाठच्या नागरिकांनी पशुधनाची तसेच अन्य काळजी घ्यावी असे अवाहन केले आहे.

Comments are closed.