Take a fresh look at your lifestyle.

धमाकेदार ऑफर! त्वरा करा…फक्त 6,499 रुपयात मिळतोय ‘हा’ 5000 mAh बॅटरी क्षमतेचा ‘हा’ जबरदस्त फोन

टेक: जर तुम्ही कमी किंमतीमध्ये बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण Infinix Smart 5A हा स्मार्टफोन आज (9 ऑगस्ट) पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध झळ आहे. कंपनीने या फोनची किंमत 7,999 रुपये ठेवली आहे, पण लॉन्च ऑफरमुळे ग्राहक 6,499 रुपयांत हा फोन घरी आणू शकतात. हा फोन 2GB + 32GB च्या एकाच स्टोरेज प्रकारात उपलब्ध. हा अल्ट्रा बजेट स्मार्टफोन आहे. या फोनची सर्वात खास बाब म्हणजे कमी किंमतीत HD + डिस्प्ले, ड्युअल रिअल कॅमेरा सेटअप, 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसर.

HD+ डिस्प्ले

Infinix Smart 5A मध्ये 6.52-इंच HD + LCD IPS इन-सेल डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो 20: 9 आहे, स्क्रीन-टू-बॉडी रेशो 90.5%आहे. हा फोन Android 11 वर आधारित XOS 7.6 वर काम करतो. फोनमध्ये Eye care मोड देण्यात आला आहे.

256 GB पर्यंत वाढवता येईल स्टोरेज

हा फोन 1.8 GHz ऑक्टा-कोर MediaTek Helio A20 प्रोसेसरसह येतो. हा फोन सिंगल व्हेरिएंट 2 जीबी रॅम + 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज मध्ये सादर करण्यात आला आहे. ग्राहक मायक्रो एसडी कार्डद्वारे त्याचे स्टोरेज 256 जीबी पर्यंत वाढवू शकतात.

बजेट फोनमध्ये मिळेल जबरदस्त कॅमेरा

या नवीन Infinix Smart 5A मध्ये 8-मेगापिक्सलचा ड्युअल AI आणि डेप्थ सेन्सर असलेला कॅमेराआहे. ट्रिपल एलईडी फ्लॅश, पिक्चर मोड, ऑटो सीन डिटेक्शन, कस्टम बोकेह आणि एआय 3D, ब्यूटी सारखे मोड फोनमध्ये उपलब्ध आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, Infinix च्या या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

सध्या हा फोन फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Comments are closed.