Take a fresh look at your lifestyle.

अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘बेल बॉटम’चा ट्रेलर झाला रिलीज, पहा जबरदस्त ट्रेलर एका क्लिकवर

नवी दिल्ली: अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बेल बॉटम’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. पुन्हा एकदा अक्षय कुमारची जबरदस्त स्टाईल ट्रेलरमध्ये दिसत आहे. या ट्रेलरमधील जबरदस्त अॅक्शन-पॅक्ड सीन्स प्रेक्षकांमध्ये रोमांच निर्माण करतात. काही तासपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून रिलीज होताच ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अक्षय पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार यात काही शंका नाही.

‘बेल बॉटम’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बराच काळ पुढे ढकलली जात होती. आधी हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख इतर चित्रपटांप्रमाणे पुढे ढकलण्यात आली होती, पण अलीकडेच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. आता हा चित्रपट 19 ऑगस्टपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

विशेष गोष्ट म्हणजे अक्षय कुमारचा हा चित्रपट 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे. या वृत्ताला दुजोरा देत अक्षय कुमारने ‘बेल बॉटम’ 3D मध्ये रिलीज करण्याची घोषणा केली. ही बातमी शेअर करत अक्षय कुमारने स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ शेअर करताना अक्षयने लिहिले, ’19 ऑगस्टला पूर्ण अनुभूतीसह थरार अनुभव करा. बेल बॉटम 3D मध्ये देखील येत आहे.’

Comments are closed.