Take a fresh look at your lifestyle.

अरे व्वा! बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये बंपर नोकऱ्या, सरकारी नोकरी हवी असेल तर लवकर करा अर्ज

मुंबई: राज्यातील अग्रणी बँक,  बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मोठी भरती होणार असून, या भरती अंतर्गत बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल- I आणि II पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती अंतर्गत एकूण 190 जागा रिक्त आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र SO भरती 2021 (Bank of Maharashtra 2021 ) साठी 19 सप्टेंबर पर्यंत अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करता येईल.

या पदांसाठी होणार भरती 

तज्ञ अधिकारी स्केल- I आणि II अंतर्गत कृषी क्षेत्र अधिकारी, सुरक्षा अधिकारी, विधी अधिकारी, एआर/पर्सनल अधिकारी, आयटी सपोर्ट ऍडमिनिस्ट्रेटर , डीबीए (MSSQL/ORACLE), विंडोज ऍडमिनिस्ट्रेटर , उत्पादन सहाय्य अभियंता, नेटवर्क आणि सेक्युरिटी ऍडमिनिस्ट्रेटर आणि ईमेल ऍडमिनिस्ट्रेटर या पदांसाठी भरती होणार आहे.

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू- 01 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2021

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2021 तपशील

कृषी क्षेत्र अधिकारी – 100
सुरक्षा अधिकारी – 10
विधी अधिकारी – 10
एचआर/पर्सनल अधिकारी- 10
आयटी सपोर्ट ऍडमिनिस्ट्रेटर – 30
DBA (MSSQL/ORACLE)- 03
विंडोज ऍडमिनिस्ट्रेटर – 07
उत्पादन सहाय्यक अभियंता- 03
नेटवर्क आणि सुरक्षा ऍडमिनिस्ट्रेटर – 10
ईमेल ऍडमिनिस्ट्रेटर – 02

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2021 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहेत.

सुरक्षा अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवी. तसेच, भारतीय लष्करात अधिकारी म्हणून किमान पाच वर्षांचा कामाचा अनुभव.
कृषी क्षेत्र अधिकारी – किमान 60% गुणांसह कृषी/ फलोत्पादन/ पशुसंवर्धन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ दुग्धशास्त्र/ मत्स्यपालन इत्यादी चार वर्षीय पदवी.
विधी अधिकारी – किमान 60% गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यामध्ये पदवी. बँकिंग कायदा, कंपनी कायदा, कामगार कायदा इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेच्या कायदेशीर विभागात किमान पाच वर्षांचा विधी अधिकारी म्हणून अनुभव.

एचआर/पर्सनल ऑफिसर-पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा इन कार्मिक मॅनेजमेंट किमान 60% गुणांसह. एचआर मॅनेजर पदावर काम करण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
IT सपोर्ट ऍडमिनिस्ट्रेटर –   इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या विषयात B.Tech/BE किंवा M.Sc काम्पुटर सायंस किंवा MCA

विंडोज एडमिनिस्ट्रेटर–  इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या विषयात B.Tech/BE किंवा M.Sc काम्पुटर सायंस किंवा MCA
प्रोडक्ट सपोर्ट इंजीनियर–  इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या विषयात B.Tech/BE किंवा M.Sc काम्पुटर सायंस किंवा MCA

नेटवर्क आणि सुरक्षा ऍडमिनिस्ट्रेटर आणि ई-मेल ऍडमिनिस्ट्रेटर  साठी सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या विषयात B.Tech/BE किंवा M.Sc काम्पुटर सायंस किंवा MCA हीच पात्रता आहे.

सूचना : पूर्ण आणि सविस्तर तपशील  पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : बँक ऑफ महाराष्ट्र भरती

उमेदवारांना सूचना : वरील माहिती मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रा द्वारे बदल होऊ शकतात , त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र चे अधिकृत नोटिफिकेशन वेळोवेळी पाहत राहणे आवश्यक आहे.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका