Take a fresh look at your lifestyle.

रायपूर येथील बालकवींना साहित्य संमेलनाचे निमंत्रण

सेलू (डाॅ विलास मोरे) :- तालुक्यातील रायपूर येथील बालकवींना नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील बाल कट्ट्यावर कविता सादरीकरण करण्यासाठी ४ डिसेंबर रोजी निमंत्रित करण्यात आले आहे.

एका खेडे गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुले अखिल भारतीय साहित्य संमेलना पर्यंत मजल मारू शकतात ही अभिमानास्पद बाब आहे. आपल्यापेक्षा आपले विद्यार्थी मोठे झाले पाहिजेत या उदात्त हेतूने प्रेरित असणाऱ्या माधव गव्हाणे या साहित्यप्रेमी व उमद्या शिक्षकामुळे जि.प. शाळा रायपूर येथील ही मुलं फक्त कविताच नाही तर नवनवीन पुस्तकावर पुस्तक परीक्षण लिहून त्या त्या लेखकांना पत्र पाठवतात व त्या लेखकां सोबत पत्र मैत्री करतात. त्यातूनच त्यांना कविता लेखनाची गोडी लावून त्यांच्यावर काव्य लेखनाचे संस्कार करत‌ घडवलेल्या बालकवीं पैकी इयत्ता सहावीतील आदर्श आसाराम गाडेकर व सोहम सुंदर उंडे ह्या विद्यार्थ्यांच्या स्वरचित कवितेचे सादरीकरण करण्यासाठी या  चिमुकल्या कवींना साहित्यिक व शास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यापूर्वीही या विद्यार्थ्यांच्या कविता महाराष्ट्र शासनाच्या किशोर मासिकातून प्रकाशित झालेल्या आहेत. परभणी आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बालमंडळ या कार्यक्रमात सुद्धा विद्यार्थ्यांचे काव्यवाचन झाले आहे. त्यामुळे या बालकवीवर गावकऱ्यांकडून तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका