Take a fresh look at your lifestyle.

बाब्बोव.. चार गाड्याभरून रोख रक्कम घेऊन ‘या’ देशात लपून बसले अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष, ऐकून विश्वास बसणार नाही’

आंतरराष्ट्रीय: तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तान मध्ये कब्जा केल्यानंतर देश सोडून पळून गेलेले राष्ट्रपती अशरफ घनी यांच्या ठावठिकाण्याचा शोध लागला आहे. ते सध्या अबुधाबी मध्ये असल्याचे वृत्त आहे.

संयुक्त अरब अमिरातने (यूएई) त्यांना मानवतावादी कारणास्तव आश्रय दिला असल्याचे सांगितले जात आहे. युएईनेच आशारफ घाणी यांना आश्रय दिला असल्याच्या बातमीची पुष्टी केली. तालिबानने दोन दिवसांपूर्वी काबूलमधील राष्ट्रपती भवनावर कब्जा केला होता. यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडल्याची माहिती मिळाली. सुरूवातीला अशरफ घनी ताजिकिस्तान या देशात पळून गेले असल्याचे समजले होते. मात्र त्या देशाने त्यांच्या हेलिकॉप्टरच्या लॅंडींगला परवानगी दिली नाही.

 

अशरफ घनी यांनी अफगाणिस्तान सोडताना सोबत चार कार आणि हेलिकॉप्टरमध्ये कथितरित्या रोख रक्कम कोंबून पैसे घेऊन गेल्याची माहिती अफगाणिस्तानातील रशियन दूतावासातील एका अधिकार्‍याने माध्यमांना दिली होती. मात्र, या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीसाठी अमेरिकेने अशरफ घनीला जबाबदार धरले

उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील संकटावर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीसाठी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांना जबाबदार धरले. अशरफ घनी यांनी न लढता आपला देश सोडल्याचे बायडेन म्हणाले.

रक्तपात टाळण्यासाठी सोडला देश

जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी मुळे अफगाणिस्तानची ही स्थिती झाली असल्याचे म्हटले आहे. मात्र, यावर अशरफ घनी यांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते, मी जर तिथे तालीबानी लढाकूसोबत लाधत बसलो असतो तर अफगाणिस्तानच्या सैन्याची आणि सामान्य लोकांचा नाहक बळी गेला साता. मी अफगाणिस्तान मध्ये शांतता पसरावी आणि संभाव्य रक्तपात टाळण्यासाठी देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले होते.

तालिबानने त्यांची भूमिका केली स्पष्ट

दरम्यान, तालिबानने महिला आणि मुली शरिया कायद्याच्या अंतर्गत राहून काम करू शकतील आणि शिक्षणही घेऊ शकतील असे जाहीर केले आहे. तसेच त्यांनी इतर सर्व राष्ट्रांना माफ केले असल्याचे जाहीर केले.

Comments are closed.