Take a fresh look at your lifestyle.

अबब … एवढी रोख रक्कम घेऊन पळाले अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष, ऐकून विश्वास बसणार नाही

काबूल:अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानची सत्ता स्थापित झाली आहे. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तत्पूर्वी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आशार्फ घाणी यांनी आपल्या कुटुंबासह देश सोडून पलायन केले असून,  या दरम्यान त्यांनी स्वतः सोबत मोठी रोख रक्कम आणि इतर महागड्या वस्तु नेल्याचे वृत्त आहे.

रशियन दूतावासाने दिली माहिती

काबूलमधील रशियाच्या दूतावासाने सोमवारी सांगितले की, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी चार कार आणि रोख रक्कमेसह हेलिकॉप्टरने देश सोडून पळून गेले असून, रोख रक्कम इतकी जास्त होती की त्यांना काही पैसे मागे सोडावे लागले, कारण हेलिकॉप्टर मध्ये जागा कमी पडत होती.

रक्तपात टाळण्यासाठी सोडला देश

तालिबानने काबुलमध्ये प्रवेश केल्यानंतर अशरफ घनी यांनी काबूल सोडले. रक्तपात टाळण्यासाठी देश सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याचा त्यांचा ठावठिकाणा अज्ञात आहे.

रशिया तालिबानचे करणार बारकाईने निरीक्षण

रशियाने म्हटले आहे की ते काबुलमध्ये राजनैतिक उपस्थिती कायम ठेवेल आणि तालिबानशी चांगले संबंध वाढवण्याची आशा आहे. रशिया सध्या तालिबानच्या वर्तवणुकीचे बारकाईने निरीक्षण करेल आणि त्यानंतरच तालिबानला अधिकृत शासकाचा दर्जा द्यायचा की नाही ते ठरवेल.

काबूलमधील रशियन दूतावासाच्या प्रवक्त्या निकिता इश्चेन्को यांनी आरआयएच्या हवाल्याने म्हटले आहे की, “अशरफ घनी यांनी अफगाणिस्तानमधून पल काढल्यानंतर स्पष्ट झाले की, त्यांच्या सत्तेचे पतन झाले आहे.”

“अशरफ घनी पळून जात असताना त्यांच्यासोबत पैशांनी भरलेल्या चार कार होत्या, तसेच त्यांनी पैशाचा दुसरा भाग हेलिकॉप्टरमध्ये भरण्याचा प्रयत्न केला, पण ते सर्व फिट होत नव्हते. म्हणून त्यांनी काही पैसे तसेच रनवे वर फेकून दिले” असे निकिता इश्चेन्को यांनी सांगितले.

Comments are closed.