Take a fresh look at your lifestyle.

अफगाणिस्तान सोडल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांची पहिली प्रतिक्रिया, ऐकून विश्वास बसणार नाही

काबूल: राजधानी काबुल मध्ये तालिबान्यांनी शिरकाव केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपति अशरफ घनी यांनी पदाचा राजीनामा देऊन देश  सोडला. अफगाणिस्तान सोडून ताजिकिस्तानला पोहोचलेल्या अशरफ घनी यांचे  एक निवेदन सोशल मीडियावर जारी करण्यात आले आहे. घनीने लिहिले की रक्ताचा पूर थांबवण्यासाठी मला हा सर्वोत्तम मार्ग वाटला. त्यांच्यासाठी हा एक कठीण पर्याय असल्याचे घनी म्हणाले.

माझ्या समोर दोनच पर्याय

घनी यांनी लिहिले, “आज माझ्या समोर कठीण परिस्थिती उभी राहिली. माझ्यासमोर 2 पर्याय आहेत. मी सशस्त्र तालीबान्यांचा जे राष्ट्रपती भवनात शिरकाव करण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यांचा सामना करावा की प्रिय देश अफगाणिस्तान सोडून जावे ज्याची मी मागच्या 20 वर्षपासून सेवा करत आहे.”

काबुलच्या लोकांवर हल्ला करण्यासाठी ते आले आहेत

त्यांनी पुढे लिहिले,जर अजूनही असंख्य देशवासी शहीद झाले आणि त्यांनी काबूल शहराचा विनाश पाहिला तर त्याचा 60 लाख लोकांच्या या शहरात मोठी मानवी आपत्ती झाली असती. तालिबान्यांनी मला हटवले, ते संपूर्ण काबूल आणि काबूलच्या लोकांवर हल्ला करण्यासाठी येथे आले आहेत”

आता देशवासीयांचा सन्मान, संपत्ती आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्यास तालिबान जबाबदार

रक्ताचा पूर टाळण्यासाठी, मला वाटले की देश सोडून बाहेर जाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. तालिबानने तलवारी आणि बंदुकांचा निकाल जिंकला आहे आणि आता ते देशवासीयांचा सन्मान, संपत्ती आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्यास जबाबदार आहेत … असेही घनी यांनी म्हटले.

तालिबान्यांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला

अल-जजीरा न्यूज नेटवर्कवर प्रसारित व्हिडिओ फुटेजनुसार, तालिबानी बंडखोरांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे.

Comments are closed.