Take a fresh look at your lifestyle.

मराठी पञकार संघाच्या अध्यक्षपदी अशोक अंभोरे तर सचिवपदी मोहन बोराडे यांची निवड 

सेलू : सेलू तालुका मराठी पञकार संघाचे अध्यक्षपदी अशोक अंभोरे तर सचिव पदी मोहन बोराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तालुका मराठी पञकार संघाची बुधवारी व्हिजन इंग्लिश स्कूल येथे संतोष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी अशोक अंभोरे तर सचिव पदी मोहन बोराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विलास शिंदे सहसचिव म्हणून शिवाजी आकात तर कोषाध्यक्षपदी निसार पठाण यांची निवड करण्यात आली. पञकार संघाचे सदस्य  राम सोनवणे, संतोष कुलकर्णी, डाॅ विलास मोरे, जयचंद खोना, श्रीपाद कुलकर्णी, बाबासाहेब हेलसकर, रेवणअप्पा साळेगावकर, पंकज सोनी, बालाजी सोनवणे, राहुल खपले, छायाचित्रकार शंभू काकडे यांची उपस्थिती होती.

 डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.