Take a fresh look at your lifestyle.

“बनवाबनवी” मधील शंतनू आठवतो का..? त्याचा मुलगा करतोय या चित्रपटाद्वारे लवकरच प्रदार्पण.

मित्रहो अनेक कलाकार आपल्या कलेतून लोकप्रिय आणि प्रसिद्ध होतात तर त्यांची मुले पुढे आपल्या आई वडिलांच्या कलेची पारख करून त्या वळणावर चालतात. नुकताच सोशल मीडियावर एक बातमी तुफान व्हायरल होत आहे. ही बाब “बनवाबनवी” चित्रपटातील कलाकाराच्या बाबतीत आहे. हा चित्रपट म्हणजे आजही रसिकांचा जीव की प्राण आहे. या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली असून आजही हा चित्रपट विशेष प्रसिद्ध आहे. यातील प्रत्येक गोष्ट लोकांच्या मनात घर करून गेली आहे.

तसेच यातील सचिन, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि यांच्या जोडीला आणखी एक पट्टीचा कलाकार म्हणजे सिद्धार्थ रे हे होय. या चौघांनी या चित्रपटाच्या कथानकाला अगदी पडद्यावर चांगलेच खेळवून ठेवले होते. त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी अनेकजण नेहमीच उत्सुक असतात. मात्र यांच्यापैकी लक्ष्मीकांत आणि सिद्धार्थ यांनी खुप वर्षापूर्वी आपला निरोप घेतला आहे मात्र त्यांच्या मुलांनी त्यांच्या कलेचा आदर राखला आहे.

शंतनू म्हणून प्रसिद्ध झालेले सिद्धार्थ नेहमीच अनेक चित्रपटात दिसले होते. त्यांनी आपला अभिनय खूपशा भूमिकेतून चाहत्यापर्यंत पोहचवला होता. आता त्यांचा मुलगा हे काम करण्यास पात्र झाला असून, त्याने एक लेखक म्हणून कलाक्षेत्रात आपले पाऊल टाकले आहे. १९९९ मध्ये सिद्धार्थ यांनी साऊथची अभिनेत्री शांतीप्रिया हिच्याशी लग्न केले होते. सिद्धार्थ आणि शांतीप्रिया याना शुभम आणि शिष्या अशी दोन मुले आहेत, दोन्हीही मुले खूपच हुशार असून उत्तम कलाकार आहेत.

मोठा मुलगा शुभम याला संगीत आणि मॉडेलिंगची फार आवड आहे. तर शिष्याने दिग्दर्शनाचा अभ्यास केला आहे. त्याची लवकरच कबीर खुराणा दिग्दर्शित “ड्रामा” ही शॉर्टफिल्म रिलीज होणार आहे. या फिल्मचे कथानक शिष्या ने लिहले आहे. याची पटकथा आपल्यासाठी नक्कीच उत्सुकता शिगेला पोहचवणारी असणार. यावर त्याची आई अभिनेत्री शांतीप्रिया हीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून तिने आपले मत लिहले आहे.

ती म्हणते की “मला माझ्या शिष्याचा खूप अभिमान वाटतो…..मी माझी एक स्वप्नाने भरलेली स्टोरी बनवलेली आहे……देव नेहमीच तुझ्या पाठीशी राहो…..आईचे प्रेम मिळो…….” सोशल मीडियावर या पोस्टची भरपूर चर्चा सुरू आहे. अनेकजण शिष्याला शुभेच्छा आणि अभिनंदन देत आहेत. त्याच्या कलेचे कौतुक करत आहेत, आता त्याची ही पटकथा कशी असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सिद्धार्थ रे यांची ही दोन्ही मुले खूप छान आहेत, त्यांनी त्यांची कला उत्तम रित्या जपली असून त्या दोघांनाही कलाक्षेत्रात यायचे आहे. त्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांची सगळी स्वप्ने पूर्ण होवोत ही सदिच्छा. त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Comments are closed.