Take a fresh look at your lifestyle.

सेलूकरांना घरपोच मिळणार आरोग्य तपासणी सेवा….

छत्रपती शाहू महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचा स्तुत्य उपक्रम आरोग्य वाहिनीचे लोकार्पण 

सेलू :- छत्रपती शाहू महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने व माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांच्या प्रेरणेने सेलूकरांना घरपोच प्राथमीक आरोग्य तपासणी सेवा देण्यासाठी आरोग्य वाहिनीचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले.

कोरोना नंतर आता ओमायक्राॅनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सेलू येथील प्रसिद्ध डॉ. अनिकेत अशोकराव जोगदंड यांनी आरोग्य वाहिनीच्या माध्यमातून सेलूकरांसाठी घरोघरी जाऊन मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी करण्याच्या उद्देशाने माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य वाहिनी आपल्या दारी हा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. या छोटेखानी कार्यक्रमात प्रथम कै. सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करून एका आरोग्य वाहिनीचे लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, डॉ अनिकेत जोगदंड, मिलिंद सावंत, नगरसेवक रहीम भाई , गौस भाई, अविनाश शेरे, मंगलताई कथले, संजय धापसे, हकीम भाई, शेख साजिद, अमजद बागवान, योगेश कथले, सुनील गायकवाड, इम्तियाज खान, विखार अहमद, अर्जुन बोरूळ, नरसिंग हरणे यांची उपस्थिती होती.

 डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.