Take a fresh look at your lifestyle.

आर्मी भरती 2021: महाराष्ट्रासह ‘या’ तीन राज्यात होणारा लष्कर भरती मेळावा स्थगित, जाणून घ्या सविस्तर माहिती

Army Recruitment 2021: भारतीय लष्कराने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रस्तावित सैन्य भरती मेळावा तूर्तास स्थगित केला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या राज्यांमधील भरती मेळावा पुढे ढकलण्यात आला असून, या संदर्भात, भारतीय लष्कराने त्यांच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर अधिसूचना जारी केली. उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे भरती मेळावा स्थगित झाल्याची माहिती तपासू शकतात. लष्करातर्फे भरती मेळावाच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

या पदांसाठी होणार आहे भरती मेळावा

भारतीय लष्करातर्फे या राज्यांमध्ये कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल जनरल ड्यूटी, कॉन्स्टेबल फार्मा आणि कॉन्स्टेबल टेक्निकल या पदांच्या भरतीसाठी भरती मेळावा काढण्यात येणार होती. या राज्यांमध्ये भरती मेळावा यापुढे प्रस्तावित तारखेला होणार नाही. या राज्यांसाठी वेगळी तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

असे होते भरती मेळाव्याचे प्रस्तावित वेळापत्रक

यूपीच्या वाराणसीमध्ये 6 ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान सैन्य भरती मेळावा प्रस्तावित होता. यूपीच्या गोरखपूर, आझमगड, बलिया, देवरिया, गाझीपूर, संत रविदास नगर, सोनभद्र, मिर्झापूर, चंदौली आणि जौनपूर जिल्ह्यांसाठी ही भरती मेळावा आयोजित करण्यात येणार होता, आता पुढे ढकलण्यात आला आहे. त्याच वेळी, महाराष्ट्रातील पुणे विभागच्या अहमदनगरमध्येही 7 ते 23 सप्टेंबर 2021 पर्यंत सैन्य भरती मेळावा होणार होता.

या व्यतिरिक्त, 15 ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली येथे एक भरती मेळावा प्रस्तावित करण्यात आला होता, तो मेळावा देखील पुढे ढकलण्यात आला आहे. लवकरच या भरती मेळव्यांचे सुधारित वेळापत्रक अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Comments are closed.