Take a fresh look at your lifestyle.

अरे वाह…आता फक्त 10 मिनिटात पॅनकार्ड मिळणार, असा करा अर्ज

नवी दिल्ली: आजच्या काळात कोणतेही काम करायचे झाले तर आधार कार्ड बरोबरच पॅनकार्ड देखील गरजेचे झाले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पॅनकार्ड गरजेचे आहे. सरकारच्या एखाद्या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी देखील पॅनकार्डची गरज भासते. बँकेतून तुम्हाला एखाद्या ठराविक रकमेपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तरी देखील पॅनकार्ड लागते. एखाद्या सरकारी कार्यालयात पॅनकार्ड काढायला गेलं तर तेथे गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्याचबरोबर कागदपत्र जमा करताना नाहक त्रास सहन करावा लागतो. परंतु आता तुम्ही ऑनलाईन घरी बसून पॅनकार्ड साठी अर्ज करू शकणार आहात.

असा करावा लागणार ‘पॅनकार्ड’ साठी अर्ज

१) तुमच्या लॅपटॉपवर कोणतेही इंटरनेट ब्राऊझर उघडून https://www.incometax.gov.in/iec/foportal/
या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

२)या पोर्टलच्या मुख्यपृष्ठावर तुम्हाला ई-पॅनसाठी अर्ज करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावे लागेल.
तुम्हाला एका नवीन विंडोवर निर्देशित केले जाईल, जेथे ‘नवीन ई-पॅन मिळवा’ हा पर्याय दिसेल. तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागणार आहे.

३)आता एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि जन्मतारीख टाकण्यास सांगितले जाईल. या तपशिलाची पडताळणी करण्यासाठी मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल. हे सर्व केल्यानंतर सबमिट टॅबवर क्लिक करावे लागेल.

४)आपल्या ई-पॅनची स्थिती तपासण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील गोष्टी कराव्या लागणार आहेत.
वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर जाऊन, ई-पॅनशी संबंधित टॅबवर क्लिक करावे लागेल.
आता तुम्ही एका नवीन विंडोवर पोहचाल जेथे ‘स्टेटस तपासा/ पॅन डाऊनलोड करा’ चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
नवीन पेजवर तुम्हाला आधार क्रमांक प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल. मोबाईल क्रमांकावर मिळालेल्या ओटीपीने त्याची पडताळणी केल्यानंतर तुम्ही तुमच्या पॅनची स्थिती सहज तपासू शकाल.

यासाठी गरजेचे आहे ‘पॅनकार्ड’

पॅनकार्ड ही तुमची ओळख आहे. त्याचे महत्व आधार कार्ड इतकेच आहे किंबहुना त्याहून अधिक आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. बँकेत अकाऊंट काढणे, बँकेतून मोठी रक्कम काढायची असेल, सरकारी योजनेमध्ये अर्ज करायचा असेल अशा बऱ्याच ठिकाणी ‘पॅनकार्ड’ बंधनकारक असतं.

Comments are closed.