मुंबई: राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असल्याने व तसेच अर्थचक्र सुरली सुरु ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल केलं होते. मात्र, त्यामुळे बरेच नागरिक मस्कशिवाय गर्दीमध्ये फिरताना दिसत आहेत. परिणामी राज्यातील कोरोना प्रकरणे वाढताना दिसत आहेत.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे (COVID-19 Cases in Maharashtra),पुन्हा वाढू लागली आहेत. बीएमसी आणि पोलिसांनी लोकांना कोविड -19 नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले. मुंबई पोलीस आणि बीएमसीचे हे आवाहन बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर फॉरवर्ड करत लोकांना मास्क घालण्याचे आणि शारीरिक अंतर पाळण्याचे आवाहन केले.
अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत लंडनमध्ये आहे. अनुष्काने सर्वांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे कारण मुंबईत बरेच लोक मास्कशिवाय फिरताना सापडले आहेत. मुंबई पोलिसांनी मंगळवारी एक ग्राफिक चित्र शेअर केले, ज्यात मास्कशिवाय फिरताना पकडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस कशी वाढत आहे, हे दर्शवले आहे . मुंबई पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी एका दिवसात मास्कशिवाय फिरणाऱ्या 920 लोकांना पकडले.
मुंबई पोलिसांचे हे ग्राफिक तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर करताना अनुष्का शर्माने लिहिले, “मास्क घाला, इतरांचाही विचार करा.” यासह, तिने आपल्या कॅप्शनमध्ये हात जोडणारे इमोजी देखील समाविष्ट केले आहेत. अनुष्का शर्माप्रमाणेच वरुण धवन, सारा अली खान, कियारा अडवाणी आणि अनिल कपूर सारख्या इतर सेलेब्सनीही त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे आणि त्यांच्या चाहत्यांना मास्क घालण्याचे आवाहन केले.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सध्या लंडनमध्ये खूप मजा करत आहेत. दोघेही आपल्या मुलीसह अनेकदा शहरात फिरताना दिसतात. या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर येताच व्हायरल होतात. या वर्षी जानेवारीत त्यांची मुलगी वामिकाचा जन्म झाला. जोडप्याने अद्याप त्यांच्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवला नाही. त्यांनी अनेक वेळा मीडियाला आपल्या मुलीचे छायाचित्र न घेण्याचे आवाहन केले आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्का शर्मा शेवटी शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. अणूशक शर्माने अद्याप तिच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही . मात्र, निर्माती म्हणून तिचा ‘बुलबुल’ आणि ‘पाताल लोक’ ही वेबसीरिज गेल्या वर्षी रिलीज झाली. या दोन्हीची समीक्षकांनी कौतुक केले होते.
Comments are closed.