वालूर मंडळातील शेतकरी आक्रमक आठ डिसेंबर रोजी रास्तारोकोचा इशारा
सेलू (डाॅ विलास मोरे) : महसूल प्रशासनाच्या चुकीच्या अहवालामुळे सन 2020 यावर्षी केवळ सेलु तालुक्यातील वालूर मंडळातील 21 गावे अतिवृष्टी अनुदानापासून वंचीत ठेवण्यात आली होती. अद्यापपर्यंतही या गावांना अतिवृष्टी अनूदान मिळाले नसल्याने दबाव गटाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोमवार 15 नोव्हेंबर रोजी लाक्षणिक साखळी उपोषण करण्यात आले
सन 2020 मध्ये तालुक्यामध्ये सर्वदूर झालेल्या पावसात 35 टक्के शेती पिकांचे नुकसान झाले होते. पाच मंडळापैकी चार मंडळांना महसूल विभागाकडून अनूदान मिळाले. मात्र वालूर मंडळातील 21 गावे तात्कालीन तहसीलदार व कृषी अधिकारी यांच्या चूकीच्या अहवालामूळे अनूदानापासून वंचीत राहिले होते. या संदर्भात वालूर मंडळातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी महसूल प्रशासनास निवेदने देवून अतिवृष्टीचे अनूदान देण्याची मागणी केली होती.
मात्र केवळ आश्वासना शिवाय शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. दरम्यान दबाव गटाच्या वतीने महसूल प्रशासनास निवेदन देऊन तात्काळ आपत्ती व्यवस्थापन निधीतून अतिवृष्टी अनूदान देण्याची मागणी करण्यात आली असून तात्काळ अनूदान दिले नाही तर 8 डिसेंबर 2021 रोजी रास्तारोको करण्यात येणार असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
यासाठी सेलू तालुका दबाव गटाचे निमंत्रक अँड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, दिलिप मगर, दिलीप शेवाळे, रामचंद्र कांबळे,गणेश मूंढे, ईसाक पटेल, अँड. देवराव दळवे, आबासाहेब भूजबळ, सतिश काकडे, अँड. योगेश सूर्यवंशी, रामप्रसाद बोराडे, लक्ष्मण प्रधान, विलास रोडगे, गूलाब पौळ,परमेश्वर कादे, सूंदर चट्टे, विठ्ठल काकडे, लक्ष्मण मोरेगावकर, लक्ष्मण गायके,सूरेंद्र तोष्णीवाल, वाल्मिक पांढरे, सूभाष काकडे,पंडीत जगाडे, रामचंद्र पारवे, तेलप्पा डूकरे, सखाराम शिंदे, रामप्रसाद बोराडे, महादेव डोईफोडे, श्रीरंग डोईफोडे, केशव डिग्रसकर आदींनी पूढाकार घेतला.
Comments are closed.